वृत्त क्रमांक 528
उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह
इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध
नांदेड दि. 23 मे :- अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा, भेटी व कार्यक्रम शांततेत पार पडावे, सदर काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोनातून महाराणा प्रतापसिंह चौक-वसंतराव नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-नवीन मोंढा-शंकरराव चव्हाण पुतळा-आयटीआय चौक, शिवाजीनगर-औदयोगिक वसाहत व आनंदनगर चौक या भागात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा-श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तथा दौ-याच्या ठिकाणी -जिल्हाधिकारी कार्यालय -महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी 25 मे 2025 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 28 मे 2025 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.
संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत केले आहेत.
00000