Monday, June 30, 2025

 वृत्त क्र. 678

शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक रस्ता वाहतुकीस प्रतिबंध  

नांदेड, दि. 30 जून :- नांदेड शहरात रस्त्याच्या कामामुळे शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस येत्या 1 ते 15 जुलै पर्यंत प्रतिबंध करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून शिवाजी महाराज पुतळा-महावीर चौक ते मुथा चौक असा राहील. 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित विभागाने पुढीलप्रमाणे उपाययोजना करुन 1 ते 15 जुलै 2025 कालावधीत नमुद  केलेल्‍या पर्यायी मार्गाने  सर्व प्रकारची वाहने  वळविण्‍यास  मान्‍यता दिली आहे. मुथा चौक ते महावीर चौक हा रस्‍ता एकेरी मार्ग असून रस्‍त्‍याचे काम होईपर्यंत सदर मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी वापरण्‍यासाठी सुद्धा परवानगी देण्‍यात आली आहे.  

नांदेड पोलीस अधिक्षक यांनी कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड, चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

00000

वृत्त क्र. 677

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

३० जून १ व ४ जुलै या तीन दिवसासाठी यॅलो अलर्ट जारी  

नांदेड, दि. ३० जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 30 जून 2025 रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 जून, 01 जुलै, 04 जुलै 2025 या तीन दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. 30 जून 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस व 01 जुलै व 04 जुलै 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

०००००

वृत्त क्र. 676

 30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत

व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश 

नांदेड, दि. 30 जून :- नांदेड जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांचा आणि विशिष्ट 10 खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांचा एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. 30 खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय  आणि 10 खाटांचे एकल विशेषता रुग्णालयांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांमध्ये पात्र रुग्णालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी केले आहे. 

यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील. नागरिकांना जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेत स्तळावर उपलब्ध केली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच खालील विशिष्ट एकल विशेषता (सिंगल स्पेशालिटी) असलेल्या 10 खाटांच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. 

पात्र एकल विशेषता रुग्णालये (10 खाटांचे):

1. ईएनटी (नाक, कान, घसा)

2. नेत्ररोग शास्त्र (नेत्रविकार)

3. ऑर्थोपेडिक आणि पॉलीट्रॉमा (अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा)

4. बर्न (भाजणे)

5. बालरोग शस्त्रक्रिया

6. कर्करोग उपचार युनिट्स

7. नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स

8. हिमोडायलिसिस - मूत्रपिंड शास्त्र युनिट्स 

योजनांचा उद्देश

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) : केंद्र सरकारची ही योजना देशभरातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या गंभीर आजार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चाचा समावेश आहे.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य : महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देते. यामध्ये 1 हजार 356 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.

 पॅनलवर समावेश प्रक्रिया:

पात्रता निकष

 30 पेक्षा जास्त खाटा असलेली रुग्णालये आणि वर नमूद केलेल्या विशेषता असलेली 10 खाटांची एकल विशेषता रुग्णालये जी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य हमी सोसायटी  निकषांची पूर्तता करतील. ती आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील.

यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.

लाभ : पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील. यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील आणि रुग्णांचे आर्थिक भार कमी होईल.

अर्ज प्रक्रिया: रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी https://www.jeevandayee.gov.in (MJPJAY) या संकेतस्थळांवर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधावा.

सहाय्यकारी माहिती:

रुग्णालयांना अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्लोबल हेल्थ गुरु Global Health Guru या युट्युब चॅनेलवर "Hospital Empanelment Application Form भरण्याचे प्रशिक्षण व्हिडिओ" उपलब्ध आहे. रुग्णालय प्रतिनिधींनी YouTube वर Global Health Guru हे चॅनेल भेट देऊन व्हिडिओ पाहावा.

जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालये:

नांदेड जिल्ह्यातील अनेक रुग्णालये ज्यात प्रामुख्याने ३० खाटांची रुग्णालये व नमूद केलेल्या विशेषता असलेली 10 खाटांची रुग्णालये देखील या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरू शकतात.

संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा पॅनलवर समावेशासाठी, कृपया डॉ. दिपेशकुमार शर्मा, जिल्हा रुग्णालय, दूरध्वनी: ८२७५०९५८१८  येथे संपर्क साधावा किंवा https://www.jeevandayee.gov.in वर भेट द्यावी.

टीप: रुग्णालयांनी पॅनलवर समावेशासाठी स्वतः पात्रता तपासावी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व https://www.jeevandayee.gov.in सदरील संकेत स्तळावर अर्ज करावा.

00000

वृत्त क्र. 675

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना 

नांदेड, दि. 30 जून :- केंद्र व राज्य शासनाच्या ड्रग मुक्त मोहिम, नशामुक्त भारत अभियान अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती मिळावी व हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांचेकडून जिल्हा समन्वयक, नशाबंदी मंडळ हे सहकार्य करणार आहे. 

नशाबंदीबाबत जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करणार आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात दंतशल्यचिकित्सा विभागामधील तंबाखू प्रतिबंध केंद्रामध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना 28 जून रोजी करण्यात आली. या केंद्राचे उदघाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. वाय.एच.चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, दंत शल्य चिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांचेसह डॉ. सुशील येमले, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांच्यासह निवासी डॉक्टर्स, परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण व रुग्ण नातेवाईक हे उपस्थित होते. 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना झाल्यामुळे व्यनाधीन व्यक्तीना, शारिरीक, मानसिक आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होईल आणि केंद्राच्या माध्यमातून त्या व्यक्तींना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन, उपचार व प्रेरणा मिळेल. या केंद्रामुळे व्यसनाबाबत समाजामध्ये जनजागृती होवून व्यसनमुक्त व सक्षम समाज निर्माण होईल अशी भावना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली.   

 00000




 वृत्त क्र. 674

इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन

स्थानिक शाखा नांदेड संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर 

नांदेड, दि. 30 जून :- इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन स्थानिक शाखा नांदेड या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नांदेड स्थानिक शाखेच्या सर्व सभासदांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (प्रशासन) संलग्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे योगेशकुमार बाकरे यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी तथा पदसिद्ध अध्यक्ष इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नांदेड शाखा यांच्या 23 जून 2025 च्या पत्रानुसार संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक (प्रशासन) संलग्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड योगेशकुमार बाकरे यांची नियुक्ती केली आहे. 

या संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 6 संचालक आहेत. चेअरमन 1 पद हे पदसिध्द आहे. दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्रमांक 2 नुसार नांदेडचे जिल्हाधिकारी हे आयआयपीए इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नांदेड स्थानिक शाखेचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आयएएस आहेत. उर्वरित पद व्हाईस चेअरमन 1, सेक्रेटरी 1, ट्रेझर 1, आणि एक्झीकेटयुव्ह मेंबर 2 असे एकूण 5 जागांची निवड करावयाची आहे. या संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमासह 1 जुलै 2025 संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. 1 जुलै ते 15 जुलै 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 16 जुलै ते 17 जुलै 2025 या कालावधीत करण्यात येऊन 18 जुलै 2025 रोजी संस्थेच्या सभासदाची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्राचे वाटप व स्विकृती करण्यात येणार असून प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी दुपारी 12.15 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी दु. 12.15 ते 13 या कालावधीमध्ये करण्यात येणार असून वैध नामनिर्देशन पत्राची यादी 13.15 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच नामनिर्देशनपत्र 13.30 पर्यत माघारी घेता येणार आहे आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी दु.14 वा. प्रसिध्द करण्यात येणार असून आवश्यकता असल्यास दु. 14.30 ते 15.30 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. झालेल्या मतदानाची मतमोजणी मतदान संपल्यानंतर लगेच करण्यात येणार असून मतमोजणी संपल्यानंतर लगेच निकाल घोषित करण्यात येणार आहे.   

संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी नांदेड मिटींग हॉल येथील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार असून अधिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, संलग्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड येथील कार्यालयात पाहावयास मिळतील, असेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 673

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता

मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन 

रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड

रोजगार मेळाव्यात 16 कंपन्यांचा 1 हजार 513  रिक्तपदांसाठी  सहभाग

नांदेड, दि. 30 जून:- युवक- युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार 27 जून रोजी श्री गुरूगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द उद्योजक अभिजीत रेणापूरकर तर अध्यक्ष आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे हे होते.  जिवन हे एक शर्यत आहे. या शर्यतीमधुन अनेक गोष्टी बदल होतात. इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा फायदा सर्वानी घ्यावा, असे मार्गदर्शन उद्योजक अभिजीत रेणापूरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच शिक्षण घेत असताना गुरूजनांचा विचार करा, समाजात वागताना आईवडीलांकडे बघा, संधीच सोन करा असा संदेश आदित्य मोटर्सचे उद्योजक अरूणजी फाजगे  यांनी  दिला.

विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य विकसित करावे. सध्या या जगात कौशल्यालाच मागणी आहे. या आधुनिक जगात कौशल्य नसल्यास जीवन जगणे कठीण आहे असे आवाहन  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले.

या रोजगार मेळाव्यामध्ये  एकूण 16 कंपन्यांनी 1 हजार 513  रिक्तपदांसाठी  सहभाग नोंदविला होता. तर एकूण 560 उमेदवार उपस्थीत होते यामधून 275 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे अशी माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दिली आहे.

00000









२८ जून 2025

 वृत्त क्र. 672

गोदाम बांधकाम अनुदानासाठी इच्छुक व पात्र अर्जदारांनी अर्ज करावेत- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

नांदेड, दि. २८ जून:- कृषि विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यासाठी राष्ट्रीय खादयतेल अभियान सन 2025-26 मध्ये स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये शेतकरी उत्पादक संघ , कंपनी (FPO/FPC) करिता जिल्हास्तरावर गोदाम बांधकामाचा 1 लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लाक्षांकाच्या अधीन राहून सरकारी/खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी (FPOS) आणि सहकारी संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील प्रस्ताव मागवण्यात येत आहेत.

या योजने अंतर्गत ज्या ठिकाणी गोदामाची व्यवस्था नाही व ज्या गावात सदर कार्यक्रम राबवण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय खादयतेल अभियानांतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजने अंतर्गत कमाल 250 मे.टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लक्ष रुपये या पैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे.

 अटी व शर्तीच्या अधीन राहून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ /कंपनी (FPO/FPC) सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार संस्थेने केंद्र शासनाच्या स्मार्ट / वखार महामंडळ यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित अर्जदार कंपनी सदर बाबीच्या लाभास पात्र राहील.

लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. महाराष्ट्र वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यानी जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी करतील. या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम डिसेंबर 2025 पुर्वी करणे बंधनकारक आहे. अपूर्ण बांधकाम डीझाईन, स्पेसिफिकेशन मध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी  उत्पादीत केलेल्या कृषि माल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा.

तरी ईच्छुक व पात्र लाभार्थींनी महाराष्ट्र वखार महामंडळाचे प्राधिकृत अधिकार्याकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डीझाईन/ स्पेसिफिकेशन व खर्चाच्या अंदाज पत्रकासह तालुका कृषि अधिकारी, कार्यालयाकडे अर्ज 31 जुलै 2025 अखेर पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

॰॰॰॰

२७ जून 2025

वृत्त क्र. 671

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड, दि. २७ जून:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 01 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 01 जुलै 2025  ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते.

 या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

००००

Friday, June 27, 2025

वृत्त क्र. 670

'विकसित महाराष्ट्र 2047साठी सर्वेक्षणामध्ये

17 जुलैपर्यंत नागरिकांनी मत नोंदवावे

नांदेड दि.27 जून : भारत सरकारच्या विकसित भारत 2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र 2047 ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 साठी व्हिजन डाक्यमेंट तयार करण्यात येणार आहे.  तरी नागरिकांनी 17 जुलै 2025 पर्यत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर व या लिंकवर https://wa.link/o93s9यावर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन नियोजन विभागाने केले आहे.

व्हिजन डाक्युमेंट तयार करण्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाच्या 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 6 मे 2025 ते 2 ऑक्टोंबर 2025 अशा 150 दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केला जात आहे. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी 16 संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषिशिक्षणआरोग्यग्राम विकासनगर विकासभूसंपदाजलसंपदापायाभूत सुविधावित्तउद्योगसेवासामाजिक विकाससुरक्षासॉफ्ट पॉवरतंत्रज्ञान व मानव विकासमनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतीशीलशाश्वतसर्वसमावेशक व सुशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीशासकीय/अशासकीय संस्थांशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीनमध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

00000

 


  वृत्त क्र. 669

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड दि27 जून :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तरी बाल शक्ती पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश डी. वाघ यांनी केले आहे.  

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी असावे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरीलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी अर्ज करु शकतात असे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 668

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारणीसाठी 75 लक्ष रुपये निधी मंजूर

नांदेड दि27 जून :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे सांडपाण्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 75 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन 2021 पासून 450 केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लॉट एसटीपी कार्यान्वित आहे. हा एसटीपी प्लांट रुग्णालयातून येणाऱ्या सामान्य सांडपाण्याचे जैविक प्रक्रीयेद्वारे शुध्दीकरण करतो. त्याच्या मदतीने पर्यावरणपूरक पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. तसेच पुनर्वापरासाठी पाणी उपलब्ध होते.

धोबीघाट, बायोमेडिकल वेस्ट साठवण क्षेत्र, ओटी कॉम्पलेक्स आणि प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रासायनिक व संसर्गजन्य सांडपाण्याच्या शुध्दीकरणासाठी स्वतंत्र ईटीपी आवश्यक असल्याचे एमपीसीबीच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. त्यामुळेच बीएमडब्लुएम नियम 2016 नुसार नवीन यंत्रणा उभारण्याची प्रक्रीया राबवीली जात आहे. या ईटीपी मध्ये प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक अशा तीन टप्प्यात सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उपचारीत पाण्याचा वापर फ्लशिंग, बागकाम आणि स्क्रबरसाठी केला जाऊ शकतो. तसेच उर्वरित पाणी सुरक्षितपणे निचऱ्यात सोडले जाईल.

रुग्णालयातून होणाऱ्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालयाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल असे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या बाबींवर सातत्याने रुग्णालय प्रशासनाचे बारीक लक्ष असून यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयात स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

कोविड काळात सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी उभारणीसाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुन मंजूरी मिळविली होती. त्याच धर्तीवर ईटीपी प्रकल्पासाठी प्रयत्न करुन हा प्रस्ताव मंजूरीपर्यत पोहोचविला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

00000

  वृत्त क्र. 666 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा  

नांदेड, दि. 27 जून :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

शुक्रवार 4 जुलै 2025 रोजी अमरावती येथून सकाळी 10.15 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. विश्रामभवन, जि.नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. रोहयोअंतर्गत शासकीय गायरान जमीनीवर चारा लागवडीसंबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसिलदार नांदेड यांनी सुचविलेल्या नांदेड तालुक्यातील जागेस भेट व पाहणी. सायं. 6 वा. सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

Thursday, June 26, 2025

 वृत्त क्र. 665

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

30 जून पर्यंत विमा योजनेत भाग घेण्याची मुदत


नांदेडदि. 26 जून :- पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025-26 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना चिकूपेरुमोसंबीलिंबू व सिताफळ या अधिसुचित पिकांकरीता अधिसुचित महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड स्टॉक एक्चेंच टॉवर्स 20 वा मजला दलाल स्टिट्र फोर्ट मुंबई 400023 यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार 2025 मधील पेरुद्राक्षसंत्रालिंबू या पिकांना भाग घेण्याची अंतिम मुदतवाढ 30 जून 2025 पर्यंत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असुन संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी उपकृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

 

पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहार मध्ये राबविण्यात येते. मृग बहार मध्ये पेरूद्राक्षसंत्रा लिंबू या पिकांसाठी भाग घेण्याची यापूर्वी अंतिम 14 जून होती. विमा योजनेत भाग घेण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in हे दिनांक 13 जून रोजी सुरु झाले. त्यामुळे पीकांची भाग घेण्याची अत्यंत अल्पकालावधी मिळाला. त्यामुळे हा कालावधी वाढविण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली असून आता या चार फळ पिकांसाठी विमा योजनात भाग घेण्याची अंतिम मुदत 30 जून 2025 अशी राहील.

 

नांदेड जिल्ह्यातील पुढील प्रमाणे अधिसूचित महसूल मंडळातील फळं पिक उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन फळ पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा.

 

फळपिक मोसंबीसाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) रुपये 1 लाखशेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम (नियमित) 5 हजार असून याप्रमाणे लिंबू संरक्षित रक्कम 80 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी 4 हजार रुपयेसिताफळ संरक्षित रक्कम 70 हजार रुपये तर शेतकऱ्यांनी 3 हजार 500चिकु संरक्षित रक्कम 70 हजार शेतकऱ्यांनी 4 हजार 900पेरु संरक्षित रक्कम 70 हजार तर शेतकऱ्यांना 3 हजार 500 रुपये विमा हप्ता रक्कम भरावयाचा आहे.

योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळे

ही योजना जिल्ह्यामध्ये पुढे दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठीअधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. मोसंबी फळपिकासाठी कंधार तालुक्यात बारुळकंधारफुलवळउस्माननगर अधिसुचित महसूल मंडळातधर्माबाद तालुक्यातील करखेली मंडळातनांदेड तालुक्यातील लिंबगावविष्णुपुरीनाळेश्वरतरोडा बु मंडळातमुखेड तालुक्यात मुखेडजाहुर मंडळातमुदखेड तालुक्यात मुदखेडबारड मंडळातहदगाव तालुक्यात हदगावपिंपरखेडमनाठा मंडळातअर्धापूर तालुक्यात मालेगाव मंडळात या अधिसुचित मंडळात पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. विमा संरक्षण प्रकार कमी पाऊस 1 ते 31 जुलै विमा संरक्षण कालावधी तर पावसाचा खंड यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 ते 31 ऑगस्ट राहील.

 

लिंबु फळ पिकासाठी उमरी तालुक्यात उमरी तर नांदेड तालुक्यात लिंबगावनाळेश्वर मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून कमी पाऊस 15 जुन ते 15 जुलैपावसाचा खंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट राहील. सिताफळ पिकासाठी कंधार तालुक्यातील बारुळकंधारदिग्रस बु. मंडळातहदगाव तालुक्यात तामसामनाठाआष्टीपिंपरखेड तर भोकर तालुक्यात भोकर मंडळात विमा भरण्याची मुदत 31 जुलै असून पावसाचा खंड 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरजास्त पाऊस 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर विमा संरक्षण कालावधी राहील. चिकु पिकासाठी नांदेड तालुक्यातील लिंबगावतरोडा बुनाळेश्वर मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून विमा संरक्षण प्रकार जादा आर्द्रता व जास्त पाऊस विमा संरक्षण कालवधी 1 जुलै ते 30 सप्टेंबर राहील. 

पेरु फळ पिकासाठी नांदेड तालुक्यात विष्णुपुरीलिंबगावनाळेश्वर मंडळातकंधार तालुक्यातील उस्माननगरबारुळलोहा तालुक्यात सोनखेडशेवडी मंडळातमुखेड तालुक्यातील जाहूरअंबुलगा बु. चांडोळीयेवती मंडळातहदगाव तालुक्यात तामसाआष्टीपिंपरखेड मंडळातभोकर तालुक्यातील मोघाळीभोसी मंडळात तर देगलूर तालुक्यात देगलूरखानापूरमाळेगावनरंगल बु मंडळात विमा भरण्याची मुदत 30 जून असून विमा संरक्षण प्रकार कमी पाऊस 15 जून ते 14 जुलै राहील तर पावसाचा खंड व जास्त तापमान यासाठी 15 जुलै ते 15 ऑगस्ट यानुसार विमा संरक्षण कालावधी राहील. 

 

या योजनेत अधिसुचित क्षेत्रातअधिसुचित फळपिकासाठी कुळाने भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पिककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपीक विमा पोर्टल WWW.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठीआधार कार्ड. जमीन धारणा 7/128 (अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्रफळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटोबँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

 

शासनाच्या 11 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये योजनेत सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टेंक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे.

 

ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे. त्या क्षेत्राच्या सात/बारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस सातबारा व पिक पिक पेरा करणे नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरणे करणेदुसऱ्या शेतकऱ्याचे शेतीवर परस्पर अधिकृत भाडेकरार न करता विमा काढणेउत्पादनक्षमता वयाची फळबाग नसताना विमा काढणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियत्रंण समितीच्या मार्गदर्शनानुसार संबंधित विमा कंपनीची राहील.

 

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत व मृग बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासननिर्णय समजून घेऊन उपरोक्त अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावेअसेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000


 वृत्त क्र. 666


अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यवाही


१६ लाख २८ हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त 


नांदेड, दि.२६ जून:- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास आज मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक आयुक्त राम भरकड यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत मिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलिस स्टेशन इतवाराचे पो कॉ हरप्रीतसिंग सुकई यांचे पथकाने मे. डायमंड ट्रेडर्स, अमेर फंक्शन हॉलजवळ, देगलूर नाका, नांदेड या पेढीची तपासणी केली. 


तपासणीवेळी पेढीमध्ये सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० या व्यक्ती पेढीमध्ये हजर होते. पेढीच्या तपासणीमध्ये राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, AAA पानमसाला, मुसाफीर पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, सिग्नेचर पानमसाला, सितार गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण १६ लाख २८ हजार ४९ रुपये एवढ्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा पोलिस स्टेशन इतवारा, नांदेड यांचे ताब्यात देण्यात येवून संबंधित हजर व्यक्ती सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० यांचेविरूध्द अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे ,अशी माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

०००००



 वृत्त क्र. 664

 दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्काराकरीता

 १५ जुलै पर्यत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 26 जून :- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 या वर्षासाठी पुरस्कारासाठी ऑनलाइन नामाकंन व अर्ज मागविण्यात आले आहेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग क्षेत्रातील संस्थांनी १५ जुलै २०२५ पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहेत.

 

अर्ज, नामांकन www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावे. राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी अर्ज नामांकने सादर करण्याच्या दृष्टीने 15 जुलै 2025 या कालावधीसाठी संकेतस्थळ सुरु राहील. राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 साठी अर्ज, नामांकन केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या URL www.awards.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करुन सादर करावेत. उक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्यालयाच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष  व सविस्तर तपशील www.depwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील.

 

तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार 2025 साठी संकेतस्थळावर माहिती भरुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

00000

 वृत्त क्र. 663

 सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी संपन्न

समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

 

नांदेडदि. 26 जून :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यामध्ये आज समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीचे  उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.





 

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास तर  सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेले पुरस्कार प्राप्त व्यक्ती भगवान ढगेडॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्राप्त व इंजि. इम्राण खान अलईम्राण प्रतिष्ठाणचे सचिव  फुले, शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्त माधव आंबटवारडॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त संस्था व व्यक्तींना संविधान प्रास्तावीक भेट देण्यात आले.

 

या समता दिंडीत गोदावरी इंटरनॅशनल पब्लीक स्कुलमहात्मा फुले हायस्कुल, शांती निकेतन पब्लीक स्कुल मालेगांवशंकरराव चव्हाण इंटरनॅशनल पब्लिक स्कूल तुकाई नर्सिग स्कुल, मुक्ताई नर्सिग स्कुलराजर्षी शाहू पब्लिक स्कूलइंदिरा इंटरनॅशनल पब्लीक स्कूलराणी लक्ष्मी माध्यमिक विद्यालय नांदेड या विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवारसहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरीसे.नि.वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक  अशोक गोडबोले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त भगवान ढगे, इंजि. इम्राण खान अलईम्राण प्रतिष्ठणचे सचिव  फुले, शाहू आंबेडकर पुरस्कार प्राप्त माधव आंबटवारडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त  व्यक्ती व विद्यार्थी, नागरीक तसेच कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने समता दिंडीत महात्मा फुले यांच्या वेशभुषेत चि. प्रेम दत्त पुंड तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत कु.दिव्या नागनाथ गवाले हया विद्यार्थीनीने सहभाग नोंदवला.

 

या समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा स्नेहनगर ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा असा होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदृनंतर सामुहिक संविधान प्रास्तावीकेचे वाचन करण्यात आले व राष्ट्रगीताने समता दिंडीचा समारोप करण्यात आला.

 

सकाळी 11 वा. समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकरसामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विविध विचार पैलु व कार्यावर मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षीत सामाजिक न्यायसमता बंधुता अधिक सक्षम होण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच बार्टी समता दूत यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे तर प्रमुख पाहुणे समातादूत प्रकल्प अधिकारी श्रीमती सुजाता पाहेरे हे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरिक्षक संजय कदम यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. आभार प्रदर्शन वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

  वृत्त क्र. 706 खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची 31 जुलै मुदत   नांदेड, दि. ८ जुलै :- खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ...