Monday, December 2, 2019
देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणूक गणांची 10 डिसेंबरला आरक्षण सोडत
नांदेड, दि. 2 :- देगलूर कृषि
उत्पन्न बाजार समिती निवडणूक बाजार क्षेत्रातील आरक्षण सोडत जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार 10 डिसेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन
नांदेड येथे सकाळी 11 वा. काढण्यात येणार आहे. सर्व
संबंधितांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन
जिल्हा निवडणूक अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रातील
लोकसभा / राज्यासभा सदस्य ,
विधानसभा / विधान परिषद सदस्य , जिल्हा परिषद
सदस्य , पंचायत समिती पदाधिकारी, संबंधीत
बाजार समितीचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत गणांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.
सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे
यांच्या निर्देशानूसार देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु
करण्यात आली आहे. यात देगलूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात 110 एकुण गावे समाविष्ट आहेत. राज्य
सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशान्वये गावनिहाय
खातेदारांची संख्या विचारात घेऊन या गावांचे एकूण 15 गणांत
(विभाग) विभाजन करुन महाराष्ट्र् कृषि उत्पन्न पणन (विकास व
विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 13 (1) मधील
तरतूदीनूसार 15 गणांपैकी महिलांसाठी- 2 गण, इतर मागासवर्गीयांसाठी- 1 गण,
विमुक्त (जाती/भटक्याह जमातीसाठी– 1 गण,
अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी- 1 गण असे
एकूण 5 गणांचे आरक्षण लॉटरी पध्दतीने जाहीर करण्यात येणार
आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा निवडणूक
अधिकारी (कृउबास) तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000
Subscribe to:
Comments (Atom)
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...
