अनुपस्थित मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण
· पुन्हा दांडी मारली तर सक्त कारवाई करणार
नांदेड दि. 5 :- निवडणूक काळात अनुपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नव्याने ट्रेनिंग घेण्यात आले असून पुन्हा कोणी दांडी मारू नये प्रशिक्षणाला उपस्थित रहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे . 16 नांदेड लोकसभा मतदार संघातर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण 29 मार्च रोजी झाले होते. त्या प्रशिक्षणास 141 मतदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. अशाना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या होत्या. अनुपस्थितीचे योग्य कारणे देत मतदान कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे लेखी उत्तर दिल्यामुळे नांदेड दक्षिण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उमाजी बोथीकर व प्रशिक्षण प्रमुख तथा नायब तहसीलदार निवडणूक शाखा नितेशकुमार बोलेलू यांनी अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज तहसील कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते.
या प्रशिक्षणास मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संगरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता मनपा व एस.व्ही.भालके यांनी पिपिटीच्या माध्यमातून संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून सांगितली. मतदान साहित्य हस्तगत करुन तपासणी करणे, मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या वाहनातूनच जाणे,प्रत्यक्ष मतदान दिवसाच्या एक दिवसापूर्वी मतदान केंद्र उभारणी करणे, त्याची दक्षता कोणती, मतदान यंत्र व व्हिव्हिपँटची जोडणी, विविध लिफाफे, विविध अर्ज कसे भरणे, मतदान यंत्र सिलींग प्रक्रिया या बाबीतून हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षकांच्या समस्येवर शंका समाधान करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे सुयोग्य प्रात्यक्षिक देण्यात आले. विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन संजय भालके यांनी केले. प्रशिक्षिण यशस्वी करण्यासाठी राजेश कुलकर्णी, राजकुमार कोटुरवार, विजय चोथवे, मकरंद भालेराव, चंद्रकला यमलवाड, साधना देशपांडे, एस.व्ही.शिंदे, डि.बी.कदम, प्रतिभा मारतळेकर, रवी दोन्तेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - विकास माने
16 नांदेड लोकसभा मतदारसंघातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण 29 मार्च रोजी झाले. त्या प्रशिक्षणास 141 मतदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. अशा अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज 5 एप्रिल रोजी तहसील कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु निवडणूक कार्य करण्याची संधी देवूनही पुन्हा 38 कर्मचारी या प्रशिक्षणात गैरहजर आढळून आले. अशा अनुपस्थित मतदान अधिकारी कर्मचारी यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी विकास माने यांनी संबंधित विभागास दिले.
0000

.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)

