Thursday, September 11, 2025

वृत्त क्रमांक 950 

जिल्ह्या तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे 

विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता 

नांदेड, दि. 11 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 11 ते 15 सप्टेंबर या पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व दिनांक 11, 13, 1415 सप्टेंबर 2025 हे चार दिवस जिल्ह्या तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

0000

विशेष लेख :

निराधार महिलांसाठी शक्ती सदनचा आधार 

महाराष्ट्र कल्याणकारी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरणसबलीकरणात आपले राज्य देशात अव्वल आहे. महिलांना शैक्षणिकसामाजिकऔद्योगिकआर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रात शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात महिला नेतृत्वक्षम व्हाव्यात यासाठी देखील विविध उपाययोजना राबविल्या जात आहे.  या योजनांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांचे शैक्षणिकआर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. महिला सक्षमीकरणाचा  समृद्ध वारसा आपल्या राज्याला आहे. हा वारसा राज्य शासन पुढे नेत असून महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवित आहेत्यापैकी एक म्हणजे  'शक्ती सदन योजना'  आहे. या योजनेमुळे निराधार महिलांना राज्यशासनाने 'शक्ती सदन'चा आधार दिला असल्याची भावना महिलांमध्ये आहे. या योजनेमुळे निराधार महिलांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होत असून शासनाची ही योजना निराधारांचे जीवनमान उंचावत आहे. 

शक्ती सदन योजना

राज्यातील निराधारनिराश्रितनैसर्गिक आपत्तीतकौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिला व त्यांच्या बालकांना अन्नवस्त्रनिवारा व वैद्यकीय मदतकायदेविषयक समुपदेशन हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शनसमुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी शक्ती सदन योजना’ राबविण्यात येते. २८ जिल्ह्यातील ४३ संस्थामध्ये ६३०० महिलांची काळजी व संरक्षण शक्ती सदन मार्फत करण्यात येत आहे.  तसेच लैंगिक शोषणाला बळी पडलेल्याअनैतिक व्यापारात अडकलेल्या महिला व मुलींचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संगोपनशिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पुनर्वसन  महिला व बालविकास विभागामार्फत राज्यात केंद्र पुरस्कृत शक्ती सदन या योजनेच्या माध्यमातून करण्यात येते. शिवणकामड्रेस डिझायनींगटायपींग,एम एच सीआयटी कोर्सनर्सींग असे विविध व्यावसायिक शिक्षण दिले जाते तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन व मदत केली जाते.  शक्ती सदनची मदत घेण्यासाठी वैयक्तिक महिला अथवा सामाजिक संस्थांना जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागात मार्गदर्शन करण्यात येते. 

महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून मिशन शक्ती हा एकात्मिक महिला सबलीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत संबल व सामर्थ्य या दोन उप योजना राबविण्यात येतात. यापैकी सामर्थ्य उपयोजनेंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत असून या योजनेकरिता  केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

विधवा महिलाकुटुंबाने दुर्लक्षित केलेल्या सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिलानैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिलाकुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधारकौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्याअनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुलीलैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुलीतसेच १२ वर्षापर्यंतच्या मुलींना शक्ती सदन’ येथे राहण्याची जास्तीत जास्त तीन वर्षासाठी राहण्याची परवानगी असते. त्यापुढे त्यांच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येतो. ५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना पाच वर्षापर्यंत राहण्याची सोय असते त्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात स्थलांतरीत केले जाते. स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने महिलांचे सहाय्य व पुनर्वसन शक्ती सदनच्या माध्यमातून करण्यात येते. राज्यात चंद्रपूरबीडअहिल्यानगरधाराशिवसोलापूरछत्रपती संभाजीनगरपालघरलातूरगडचिरोलीभंडाराधाराशिवनागपूरमुंबई उपनगर (२)पुणेअकोलालातुरसांगलीभंडारावाशिम तसेच अकोला या जिल्ह्यात २१ ठिकाणी शक्ती सदन’ कार्यरत आहे. २२ राज्य महिला गृहे कार्यरत आहेत.  

या योजनेअंतर्गत अन्नवस्त्र व निवारा या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. तसेचपिडीत महिलेला कायदेशीर सहाय्य विधि सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत दिले जाते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. वन स्टॉप सेंटर’ या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या समुपदेशकांमार्फत सदनातील महिला व मुलींना मनो-सामाजिक समुपदेशन व सेतू सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. ई-लर्निंग व खुल्या शाळा प्रणालीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात येतात. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत रोजगार आणि प्रशिक्षण महासंचालनालय किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण परिषद यांचेकडे नोंदणीकृत संस्थामार्फत शक्ती सदनातील महिलांना व्यावसायिक तथा कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्यात येते. तसेचशक्ती सदनातील महिलांच्या नावे बँक खाते सुरू करून ५०० रूपये एवढी रक्कम जमा करण्यात येते. सदनामधून बाहेर पडताना संबंधित महिलेस व्याजासह संपूर्ण रक्कम देण्यात येते. 

मानवी तस्करी व देह विक्री व्यवसायास बळी पडलेल्या पिडितांच्या पुन:एकात्मिकरण व प्रत्यापर्णासाठी मानवी तस्करी विरोधी युनिट्सना शक्ती सदनामार्फत हाफ - वे होम अंतर्गत पिडीत महिलेला नोकरी  करण्याची संधी देण्यात येते.  जेणेकरून पिडितांना सदनातील जीवनापासून ते समाजातील स्वतंत्र जीवनामध्ये सहजपणे संक्रमण करता येईल.  याचबरोबर पिडीत महिलेला मायदेशी पाठविण्यासाठी संपूर्ण जबाबदारी घेतली जाते. प्रत्येक शक्ती सदनात महिलांची कमाल क्षमता ही ५० इतकी आहे. 

सक्षम पोर्टल -

सक्षम पोर्टल ही एक वेब बेस यंत्रणा आहेया माध्यमातून  राज्यातील महिला संरक्षणगृहशक्तीसदन गृह यामध्ये दाखल होणाऱ्या पिडीत गरजू महिलांची बायोमेट्रिक नोंद घेण्यात येते. यामध्ये दाखल होणाऱ्या महिलांच्या बोटाचे ठसे तसेच फोटो घेतला जातोमहिलेची प्राथमिक माहितीकौटुंबिक माहिती घेतली जाते. पिडीत महिला संरक्षणगृहातून बाहेर पडल्यावर सुद्धा नोंद घेण्यात येते.  सर्व संरक्षणगृह एकमेकांना जोडली गेलेली असल्यामुळे सदर महिला इतर कोणत्याही गृहामध्ये पुनःप्रवेशित झाल्यास तिची माहिती ऑनलाईन दिसणार आहे.

ही योजना ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली असून,  सध्या ६३०० महिलांची माहिती सक्षम पोर्टलवर नोंदविली गेलेली आहे. सुरवातीला ५-७ शासकीय महिला राज्यगृहांमध्ये ही योजना  राबविण्यात आली नंतर टप्प्याटप्याने उर्वरित शासकीय महिला राज्यगृहांमध्ये राबविण्यात आली. एप्रिल २०२५ मध्ये केंद्र पुरस्कृत शक्तीसदन योजनेच्या संस्थांचा सुद्धा यात समावेश करण्यात आला.  २८ जिल्ह्यातील ४३ संस्था सक्षम पोर्टलवर जोडल्या गेलेल्या आहेतयामध्ये २१ शांती सदन२२ महिला राज्यगृहांचा समावेश आहे. तसेच१०० पेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. 

श्रद्धा मेश्रामविभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय,

000





 जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर, दि.11, (विमाका) :- जागतिक कौशल्य विकास स्पर्धा दर दोन वर्षानी होते. ही जगातील सर्वांत मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. २ वर्षानी आयोजित केली जाणारी सदर जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२६ मध्ये शांघाई येथे आयोजित होणार आहे. याकरीता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्याधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत. 

त्यानुसार सदर जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे. 

पात्रता निकष

१. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे.

२. यासाठी वयोमर्यादा : कमीत कमी १६ वर्षे जास्तीत जास्त दि. १ जानेवारी, २००४ किंवा तद्नंतरचा जन्म दिनांक असणे अनिवार्य आहे.

३. सदर स्पर्धा ६३ विविध कौशल्य क्षेत्रांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

४.स्पर्धतील सहभागासाठी उमेदवारांनी https://www.skilindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवुन दि. ३०.०९.२०२५ पर्यंत नोंदणी करून आपला सहभाग निक्षित कराया 

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकिय व खाजगी औद्यौगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, एमएसएमई टूल रूम्स, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे, हॉस्पिटेलिटी इंस्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, इतर सर्व प्रशिक्षण संस्था यांनी विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपत्र व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करावे असे आवाहन उप आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे. 

*****

वृत्त क्रमांक 949 

श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरात 17 हजारांवर रुग्णांची आरोग्य तपासणी


·  नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सवात घेण्यात आली 314 समुदाय आरोग्य शिबिरे 

नांदेड, दि. 11 सप्टेंबर :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या पुढाकाराने श्री गणेशा आरोग्याचा या अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरांना नांदेड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत नांदेडमध्ये एकूण 314 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यात 17 हजार 444 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली त्यात 7 हजार 263 पुरुष, 6 हजार 910 महिला,  1 हजार 726 लहान मुले व 1 हजार 545 लहान मुलींचा समावेश होता. या शिबिरात विविध तपासण्या आणि उपचार करण्यात आले. यामध्ये एकूण 2 हजार 187 तपासण्या झाल्या. तसेच 253 रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. 

आयुष्मान भारत कार्ड्सची निर्मिती

श्री गणेशा आरोग्याचा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागरण करण्यात आले. त्यामध्ये विशेषत: मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्मान भारत योजनेची माहिती देऊन कार्ड्स काढण्यावर भर देण्यात अला. एकूण 1 हजार 597 रुग्णांचे कार्ड्स काढण्यात आले. त्यामुळे त्यांना भविष्यात मोफत किंवा सवलतीच्या दारात उपचार मिळण्यास मदत होईल. 

सहभागातून यशस्वी उपक्रम

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने स्थानिक गणेश मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्न रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये, सर्वाजनिक आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्यवर्धिनी केंद्रे, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी सक्रीय सहभाग घेतला.

0000



वृत्त क्रमांक 952

जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पामार्फत

एक दिवसीय कार्यशाळा संपन्न 

नांदेड दि. 11 सप्टेंबर :- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सोमवार 8 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समुदाय आधारीत संस्थेतील संचालक मंडळांना तांत्रिक सहाय्य देण्यासाठी (TSA)-Palladium Consulting India Pvt.Ltd जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प नांदेड यांच्यामार्फत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. लातूर विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकात भास्कर कोळेकर यांनी स्मार्ट प्रकल्पातील Palladium चे तांत्रिक सहाय्य याबाबतची माहिती दिली.  

या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून हनमंत आरदवाड, Access to finance and procurement associate, Latur (TSA)-Palladium Consulting India Pvt.Ltd संस्थेकडून यांनी विविध समुदाय आधारीत संस्थाच्या पिक द्धती, मालाची खरेदी विक्री प्रक्रिया, निर्यातीबाबत प्रशिक्षणार्थीशी सहभागी तत्वावर सहभाग नोंदवून माहिती सादर केली. मंगेश लांबाडे Agri Business Associate यांनी मशिनरी युनिट मधील अन्न सुरक्षा, मानके याबाबत माहिती दिली. तर स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांनी नांदेड जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पाची सद्यस्थिती बाबतची माहिती दिली. 

या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व समुदाय आधारीत संस्थेचे संचालक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 22 समुदाय आधारित संस्थेमधील प्रत्येकी 5 संचालक या कार्यशाळेस उपस्थित होते. शेवटी अर्थशास्त्रज्ञ राहूल लोहाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीमती दिपा भालके, रामप्रभु कोरके, राजाभाऊ चौडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. 

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...