Sunday, May 25, 2025

 वृत्त क्रमांक 535 

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा 

नांदेड दि. 25 मे :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या सोमवार 26 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

सोमवार 26 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाने दुपारी 12 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वा. माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- नागार्जुन कॉर्नर वसंतराव नाईक चौक नांदेड. दुपारी 3.35 वा. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्थळ- तुळजाई कॉम्पलेक्स भाग्यनगर नांदेड. दुपारी 3.50 वा. नवामोंढा मैदान नांदेड येथे आगमन. दुपारी 4 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर जनसभेस उपस्थिती. सायं. 5.35 वा. नवामोंढा मैदान येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं 5.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 7 वा. भारतीय जनता पार्टी महानगर कार्यालयाकडे रवाना स्थळ- नाना-नानी पार्क नांदेड. रात्री 7.25 वा. खासदार अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानाकडे रवाना. रात्री 7.30 वा. खासदार अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. रात्री 9 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे रवाना. रात्री 9.15 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. रात्री 10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथून मुंबईकडे रवाना होतील.

000

वृत्त क्रमांक 534

सांगवी बु. येथील आजचा आठवडी बाजार राहणार बंद  

नांदेड दि. 25 मे :- मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे सोमवार 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. बाजाराच्या या भागात मोठया प्रमाणात दुकाने लागुन खरेदी विक्रीसाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. त्‍यामुळे वाहतुक मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे 2025 रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 प्रमाणे निर्गमीत केले आहेत.

0000

हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण

प्रति,

मा. संपादक / आवृत्ती प्रमुख/

विशेष प्रतिनिधी / जिल्हा प्रतिनिधी / इलेक्ट्रॉनिक मिडीया, नांदेड.  

विषय :- हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

सन्माननीय महोदय,

महापालिकेच्या वतीने हरितक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.ना.श्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री देवेंद्र फडणवीस तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री मा.ना.श्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्थळ:- कै.वसंतराव नाईक चौक, नागार्जुन हॉटेल जवळ, नांदेड येथे सोमवार दिनांक 26 मे 2025  दुपारी 3.10 वा. तरी सदरील आयोजित कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.  

धन्यवाद !

आपला स्नेहाकिंत

 स्वा/-

गिरीश कदम,

अतिरिक्त आयुक्त,

नां.वा.श.म.न.पा.नांदेड

वृत्त क्रमांक 533

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा    

नांदेड दि. 25 मे :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 26 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

सोमवार 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. परभणी येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळयाचे अनावरण सोहळयास उपस्थित. दुपारी. 1.45 वा. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. ठिकाण भाग्यनगर रोड नांदेड . दुपारी 2 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.ना. अमितभाई शाह यांच्या शंखनाद जाहीर सभेस उपस्थिती. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायं. 6 वा. भाजप महानगर कार्यालयाचे उदघाटनास उपस्थिती. ठिकाण नाना-नानी पार्कसमोर नांदेड . सायं. 7.30 वा. आनंद निलमय, शिवाजी नगर नांदेड येथे राखीव. सोईनुसार नयनस्वप्न निवास, जुना पेडगाव रोड परभणी कडे प्रयाण करतील.

0000

15.7.2025.