वृत्त क्रमांक 895
रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड
देगलूर महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न
नांदेड दि. 22 ऑगस्ट :-नांदेड जिल्ह्यातील रोजगार ईच्छूक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र व देगलूर महाविद्यालयाच्यावतीने 21 ऑगस्ट रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन देगलूर महाविद्यालयात करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे हे होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 11 कंपन्यांनी 464 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला असून एकूण 281 उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी 124 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
00000