Thursday, August 14, 2025

 निमंत्रण – जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल शुभारंभ

सर्व मान्यवर पत्रकार बांधव, नमस्कार.

जिल्हा परिषद नांदेड तर्फे विकसित जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल या एकात्मिक माहिती पोर्टलचा शुभारंभ मा. पालकमंत्री महोदय, नांदेड जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

📅 दिनांक: 15 ऑगस्ट 2025

🕤 वेळ: सकाळी 9.30 वा.

📍 स्थळ: यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड

कृपया आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची प्रसिद्ध करावी, ही विनंती.

🙏

विनीत,

उप मुख्य कार्यकारी अधिकारी, 

सामान्य प्रशासन विभाग,

जिल्हा परिषद नांदेड

वृत्त क्रमांक 856

हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत सकाळी 7.45 वा. तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा वसतिगृह इमारत येथून सुरुवात होवून कुसुम सभागृह (आयटीएम कॉलेज) आयटीआय चौक मार्गे शिवाजीनगर ज्योती टॉकीज रोड, क्रीडा वसतिगृह स्टेडीयम मुख्य कमान जवळ समारोप करण्यात आला. 

या हर घर तिरंगा अभियान मॅरेथॉन रॅलीस नांदेड जिल्हयातील खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक, मार्गदर्शक, नागरीक इतर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल कॅम्पचे अधिकारी कर्मचारी, एकनाथ पाटील अकॅडमीचे पोलीस प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक वैभव दमकोंडवार आदी उपस्थित होते. सदर रॅली उत्साहात संपन्न झाली. 

भारतीय स्वातंत्राच्या 79 स्वातंत्र दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. या उददेशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी मागील दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही 2 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सामूहिक बांधिलकीचे मूर्त स्वरुप असलेल्या व देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियान 2025 राबविण्यात येत आहे. 

ही रॅली यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन चंद्रप्रकाश होनवडजकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी डॉ. राहुल श्रीरामवार, विपुल दापके, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदिनी यशस्वी करण्यास सहकार्य केले.

00000








 वृत्त क्रमांक 855

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान 

ग्राहकांनी सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मिठाई, खवा, दुध, दुग्धजन्य पदार्थ व इतर  सुरक्षित अन्न पदार्थ  उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी  झिरवाळ यांच्या संकल्पनेतून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा  ही राज्यव्यापी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. 

ही मोहिम जनजागृती, प्रचार व अंमलबजावणी या  तीन स्तरावर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाकडून मिठाई विक्रेते,  खाद्यतेल रिपॅकर्स यांच्या बैठका घेऊन सुरक्षित अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये कायद्यातील तरतूदीची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणी दरम्यान  पेढीमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची जाणीव अन्न व्यावसायिकांना करून देण्यात आली.

या मोहिमेची अंमलबजावणी करीत असताना 11 ऑगस्टपासून आजपर्यंत अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत स्वीट मार्ट, दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थाच्या विक्री करणाऱ्या आस्थापनाच्या तपासण्या करून खवा, पनीर, पेढा, बर्फी, खाद्यतेल इत्यादी असे एकूण 20 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.  एका पेढीतून पनीर या अन्न पदार्थाचा एकूण 118कि. ग्रॅ. किंमत रूपये 33 हजार 40 रुपयांचा साठा संशयावरून जप्त करण्यात आला आहे.

ग्राहकांनी सणासुदीच्या काळात अन्न पदार्थ खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. अन्न पदार्थ खरेदी करतेवेळी अन्न पदार्थांची विधीग्राहयता तपासून घ्यावी. मिठाई व दुग्धजन्य अन्न पदार्थाची साठवणूक योग्य ठिकाणी करून त्याचा वापर लवकर करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तसेच अन्न भेसळी सारखा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा FoSCoS या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सं.ना.चट्टे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 854

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 9 ते 10.15 वा. भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण, राष्ट्रध्वज मानवंदना व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सकाळी 10.25 वा. जिल्हा परिषद, नांदेड यांच्यावतीने नागरिकांसाठी सुरु केलेल्या जि.प. नांदेड डिजीटल मित्र व्हॉटसअप चॉटबोट सेवेच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. स्थळ : यशवंतराव चव्हाण सभागृह नांदेड . सकाळी 10.55 वा. जिल्हा परिषद नांदेड येथून कोनाळे क्लासेसे, क्रीडा संकुल समोर, गोकुळ नगरकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 11.05 वा. कोनाळे क्लासेस येथे आगमन व नांदेड पोलीस यांच्यावतीने आयोजित स्ट्रीट सेफ्टी निर्भया रॅलीमध्ये सहभाग. सुरुवात- कोनाळे क्लासेस, क्रीडा संकुल समोर, गोकुळ नगर नांदेड. सांगता-मोठया राष्ट्रध्वजाजवळ श्री. शंकरराव चव्हाण मेमोरियल चौक, व्हीआयपी रोड, नांदेड. सकाळी 11.35 वा. श्री. शंतनु डोईफोडे, संपादक, दै. प्रजावाणी यांचे राहते घरी स्नेहभेट. सकाळी 11.50 वा. सांगवी नांदेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 12 वा. सांगवी, नांदेड येथे आगमन व डिटेंलिग डॅडी वैष्णवी ऑटो केअर कार वॉशिंग युनिट यांचे शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- टाटा शोरुमच्या बाजूला, स्वागत लॉन्ससमोर, सांगवी, नांदेड . सोईनुसार नांदेड येथून छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण करतील.  

00000

वृत्त क्रमांक 853

राज्य व जिल्हास्तरीय जागतिक कौशल्य स्पर्धा 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी नावनोंदणी करावी

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांसाठी कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखी आहे. ही स्पर्धा 2026 मध्ये शांघाई येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 23 वर्षाखालील पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन 30 सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त, डॉ.राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने 2026 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सेक्टर स्किल कौन्सिल विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.

शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 जिल्हा, विभाग, राज्य, देशपातळीवरून प्रतिभासंपन्न कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व आयटीआयएस, पॉलिटेक्निक, एमएसएमई टुल्स रूम्स, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी संस्था, कॉर्पोरेट तंत्र संस्था, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबी व्हीईटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, ललित कला महाविद्यालये, फ्लॉवर प्रशिक्षण संस्था, ज्वेलरी मेकिंग संस्था, शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवेदन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 साठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी हेाण्यासाठी 50 क्षेत्रांकरीता उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. या क्षेत्राची माहिती https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

वृत्त क्रमांक 852

शेतकऱ्यांनी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 14 ऑगस्ट :-राज्य शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याला एकूण 49 कोटी 24 लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त  आहे. तरी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी 12 कोटी 31 लाख, पावर टिलरसाठी 4 कोटी 92 लाख, ट्रॅक्टर चलीत औजारे 14 कोटी 77 लाख, मनुष्य चलीत व बैल चलीत औजारे 98 लाख 48 हजार, स्वयंचलित औजारे 3 कोटी 44 लाख, पिक संरक्षण औजारे 2 कोटी 46 लाख, फलोत्पादन, काढणी पश्चात व प्रक्रिया यंत्रे 2 कोटी 95 लाख आणि कृषी औजारे बँकसाठी 7 कोटी 38 लाख असे एकूण 49 कोटी 24 लाख रुपयाचे लक्षांक प्राप्त आहे. 

या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे, यंत्रसामुग्री व यांत्रिकीकरण सुविधांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी  www.mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेत प्रथम अर्ज प्रथम लाभ या तत्वानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. शेतकऱ्यांनी अर्ज करताना फार्मर आयडी, आधारकार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करावीत असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 851

समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने मंगळवारी यशवंत महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर नांदेड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेसाठी प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना राबविण्यात येतात. तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झालेले आहे.
00000

वृत्त क्रमांक 850 

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरुवार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. शिवगड शासकीय निवासस्थान मुंबई येथून वाहनाने (मुंबई-ठाणे-नाशिक-छत्रपती संभाजीनगर-समृद्धी महामार्ग-मालेगाव-वाशिम-हिंगोली मार्गे नांदेड) नांदेडकडे प्रयाण. रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

00000

 वृत्त क्रमांक 849

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 15 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वा. मुंबईहून विमानाने नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 6.15 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण.  सकाळी 10.15 वा. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड कडे प्रयाण. दुपारी 12.50 वा. श्री. गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन.  दुपारी 1 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून पुणे लोहगावकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक 848

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे 15 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वा. वाशिम येथून नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं 6.15 वा. नांदेड विमानतळ येथून लोहगाव पुणेकडे प्रयाण करतील. 

0000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...