Thursday, August 14, 2025

वृत्त क्रमांक 852

शेतकऱ्यांनी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 14 ऑगस्ट :-राज्य शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याला एकूण 49 कोटी 24 लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त  आहे. तरी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी 12 कोटी 31 लाख, पावर टिलरसाठी 4 कोटी 92 लाख, ट्रॅक्टर चलीत औजारे 14 कोटी 77 लाख, मनुष्य चलीत व बैल चलीत औजारे 98 लाख 48 हजार, स्वयंचलित औजारे 3 कोटी 44 लाख, पिक संरक्षण औजारे 2 कोटी 46 लाख, फलोत्पादन, काढणी पश्चात व प्रक्रिया यंत्रे 2 कोटी 95 लाख आणि कृषी औजारे बँकसाठी 7 कोटी 38 लाख असे एकूण 49 कोटी 24 लाख रुपयाचे लक्षांक प्राप्त आहे. 

या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे, यंत्रसामुग्री व यांत्रिकीकरण सुविधांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी  www.mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. या योजनेत प्रथम अर्ज प्रथम लाभ या तत्वानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. शेतकऱ्यांनी अर्ज करताना फार्मर आयडी, आधारकार्ड, बँक पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करावीत असे कृषी विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...