Monday, November 18, 2019


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेसाठी नविन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
              नांदेड दि. 18 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नविन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आपला अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन नांदेड येथे स्वत: शनिवार  30 नोंव्हेबर 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
        सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. यात भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार  थेट वितरीत करण्यात येते.
लाभाचे स्वरुप या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पुढील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे राहतील. विद्यार्थी अनुसूचित जाती नवबौध्द या प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांस इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदवीकामध्ये किमान 50 टक्के पेक्षाजास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेदिव्यांग (अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेलली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा.
विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक  असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. अर्जाचा नमुना http://sjsa.maharashtra.gov.in किंवा http://maharashtra.gov.in हे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 
अर्ज करण्यासाठी जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा,आधारकार्डची प्रत, बँक पासबुक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र/फॉर्म नं.16, विद्यार्थी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, इयत्ता 11 वी 12 वी पदवीचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफिकेट, विद्यार्थीनी विवाहीत असल्यास पतीच्या उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधारक्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्यानी कोणत्याही शासकिय वसतिगृहात प्रवेश घेतल्या नसल्याचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र, विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इत्यादी), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील.
विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देवुन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण केल्यास अथवा नौकरी व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेवुन गैरवापर केल्याचे निदर्शनास अल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल.  
अपुर्ण भरलेले, आवश्यक कागदपत्र सादर केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही, असेही आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.
00000


मतदार यादीचा विशेष संक्षिप्त
पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित
         नांदेड दि. 18 :- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार 30 डिसेंबर 2019 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून 4 व 5 जानेवारी  2020 रोजी तसेच दिनांक 11 व 12 जानेवारी 2020 विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी दिनांक 2 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
       मतदार यादीमध्ये नाव नोंदणी, दुरुस्ती, वगळणी करावयासाठी मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील. मतदार यादीमध्ये ज्या मतदाराची नावे समाविष्ट नाहीत अशा मतदारांना नमुना 6 मध्ये अर्ज सादर करुन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना-6 अ मध्ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नोंदीबाबत अक्षेप असल्यास ही नोंद वगळण्यासाठी नमुना-7 मध्ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्या नोंदीबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना-8 मध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादीभागात नोंद स्थलांतरीत करावयाची असल्यास विहित नमुना 8-अ मध्ये अर्ज सादर करता येतील.
       अर्ज मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयात त्याचप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा बिएलओ यांच्याकडे मतदान केंद्रावर सादर करता येतील.
       दि. 1 जानेवारी 2020 रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारिख दि. 1 जानेवारी 2002 रोजी किंवा त्यापूर्वीची आहे व जो त्या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी, यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


राज्यस्तर शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे  
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज उद्घाटन   
नांदेड दि. 18 :- क्रीडा युवक सेवा संचालनालय अंतर्गत नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय नेटबॉल (14 वर्षे मुले मुली) क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते मंगळवार 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वा. खालसा हायस्कुल नांदेड येथे होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, श्री हुजुर साहिब सचखंड गुरुद्वारा बोर्डचे अधीक्षक गुरुविंदरसिंग वाधवा, क्रीडा युवक सेवा उपसंचालक राजकुमार माहादावाड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक विठ्ठलसिंह परिहार, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक उमेश ढाके, सहाय्य व्यवस्थापक निलेश चौधरी, गुरुद्वारा बोर्डचे अधिक्षक नारायणसिंग नंबरदार, रणजितसिंग चिरागिया, अमॅच्युअर नेटबॉल असोसिएशन महासचिव डॉ. ललित जिवानी, अमॅच्युअर नेटबॉल असोसिएशनचे सहसचिव श्याम देशमुख, प्राचार्य गुरुबचनसिंग शिलेदार, खालसा हायस्कुलचे मुख्याध्यापक चाँदसिंग, जिल्हा नेटबॉल असोसिएशन  सचिव प्रवीणकुमार कुपटीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
            या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून 300 ते 350 मुले-मुली खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक, पंच, निवड समिती सदस्य, स्वयंसेवक आदी उपस्थित राहणार  आहेत. या स्पर्धांचे आयोजन बाद पध्दतीने होणार आहेत. या स्पर्धेतून निवडलेला महाराष्ट्र राज्याचा मुला-मुलींचा संघ नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन महाराष्ट्राचा प्रतिनिधीत्व करेल.
            ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, क्रिडा उपसंचालक राजकुमार माहादावाड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी विलास चव्हाण, क्रीडा अधिकारी गुरुदिपसिंघ संधु, किशोर पाठक, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, प्रवीण कुपटीकर (सचिव नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन), रवी बकवाड, संघटना प्रतिनिधी, आनंद जोंधळे (क्रीडा शिक्षक, शासकीय आश्रम शाळा,उमरी बा), हनमंत नरवाडे सुमेध नरवाडे आदी परिश्रम घेत आहेत.
0000

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...