वृत्त क्रमांक 827
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महाविर चौक मार्गावर
10 ते 16 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 9 ऑगस्ट :- स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोनातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा-जिल्हाधिकारी कार्यालय-महात्मा गांधी यांचा पुतळा ते महाविर चौक या मार्गावर 10 ऑगस्ट रोजी 24.00 वा. ते 16 ऑगस्ट 2025 रोजीच्या 00.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.
या मार्गावर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या काळात उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा,
रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास
प्रतिबंध केले आहे. संबंधीतावर नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यास पुरेसा अवधी
नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात
आला आहे.
00000