Tuesday, February 18, 2020


महावितरणने थकीत देयकांची
गावनिहाय यादी तयार करावी
                                                                --- पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड, दि. 18 :-  जिल्ह्यातील ज्या-ज्या गावांकडे वीज देयके थकीत आहेत, त्या गावांची गावनिहाय व वीज देयकनिहाय माहिती तयार करावी, जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. चव्हाण संपन्न झाली.
यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर दिक्षाताई धबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहने, कार्यकारी अभियंता श्री. गोपूलवार, नांदेड ग्रामीणचे कार्यकारी अभियंता श्री. दासकर, नांदेड शहरीचे कार्यकारी अभियंता श्री.पहूरकर, देगलूरचे कार्यकारी अभियंता श्री. चाटलवार यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यांनी वीज देयकाच्या थकबाकी तसेच वसुलीबाबत मॉनिटरिंग ठेवण्यात यावे. तसेच ट्रान्सफार्मची स्थिती, ऑईल, स्ट्रीट लाईट, किटकॅट आदि बाबतचीही माहिती देण्यात यावी. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसांनी बैठक घ्यावी तसेच मॉनिटरींगही ठेवण्यात यावे. ट्रान्सफार्मरची दुरुस्ती, शहरी भागातील अंतर्गत वायरिंग ही कामे दर्जेदार करावेत, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.

0000

हरित क्रांतीचे प्रणेचे वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारणीसाठी
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

नांदेड, दि. 18 :- नांदेड शहरातील वखार महामंडळाच्या जागेत हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक याचा पुतळा बसविण्यासंबंधी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत श्री. चव्हाण संपन्न झाली.
यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर दिक्षाताई धबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची उपस्थिती होती.
येथील वखार महामंडळाच्या जागेत सर्व्हे नं. 234, असदुल्लाबाद येथे  हरित क्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक याचा पुतळा बसविण्याचे प्रस्तावित आहे. पुतळ्यासाठी 276.88 चौरस मीटर जागा वखार महामंडळाकडून महानगरपालिकेने घेवून बसविण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी यावेळी दिले.
0000

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या
नांदेड येथील नवीन इमारतीस
पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड, दि. 18 :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नांदेड येथील इमारतीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची उपस्थिती होती.
मंडळाच्या योजना, उपक्रमाबाबत प्रत्येक उपक्रम हॉलला भेट देवून योजना उपक्रमाबाबत औरंगाबाद विभागाचे प्र. सहाय्यक कल्याण आययुक्त मनोज पाटील, नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांनी माहिती दिली.
कामगार कल्याण भवनाचा जास्तीत जास्त उपयोग हा कामगारांना कसा होईल यासाठी नवीन उपक्रम सुरु करावा. व कामगारांना त्याचा लाभ कामगारापर्यंत कसा पोहचेल यासाठी प्रयत्न करावेत, अशीही सुचना पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केली. तसेच एकंदरीत सुरु असलेल्या कामाबाबत समाधानही व्यक्त केले.
यानंतर मंडळाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे औरंगाबाद विभागाचे सहा. कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत,जिल्हाधिकारी विपीन इटणकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,औरंगाबाद विभागाचे सहा. अधीक्षक बी.पी.जरारे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस आदिंची यावेळी उपस्थिती होती.
0000


ऊर्दू घराची पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून पहाणी
नांदेड, दि. 18 :- नांदेड शहरातील मदिनानगर येथील मदिना तुल उलून शाळेजवळ महानगरपालिकेच्या भुखंडावर बांधण्यात आलेल्या ऊर्दू घराची पाहणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली.
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पाहणी करतेवेळी म्हणाले, प्रामुख्याने व प्राधान्याने उर्दू भाषेचा प्रसार व विकास उर्दू साहित्याचा व कलात्मकतेचा प्रसार व विकास नाट्य, शास्त्रीय, नृत्य व त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजनासाठी करण्यात येत आहे. इतर वेळी उर्दू शिवाय अन्य भाषांच्या साहित्यिक व सांस्कृतिक स्वप्नचे कार्यक्रम घेण्यासाठी ऊर्दू घराचा वापरासाठी असणार आहे. उर्दू घराचे लवकरच उद्घाटन करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर दिक्षाताई धबाले, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूर, शमीम अब्दुला आदिंची यावेळी उपस्थिती होती.
0000


नाल्यांचे पाणी नदीत जाऊ नये यासाठी
उपाययोजना कराव्यात - पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 18 :- नांदेड मधील नाल्यांचे पाणी नदीमध्ये जाऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत             श्री. चव्हाण बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर दिक्षाताई धबाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता अनिल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता रविंद्र सरपाते, सल्लागार प्रतिनिधी महेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.  
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, नागपूर मनपाने केलेला प्रकल्प अहवालाचा अभ्यास मंत्रालयात जाऊन करावा. नांदेड शहराच्या भविष्याचा विचार करुन 77 कोटीच्या प्रकल्पाचा अहवाल पुन:श्च परिपूर्ण तयार करावा. चालु असलेल्या 16.65 कोटीचा एसपीएस, एसटीपीचे काम 15 दिवसासाठी थांबवून सल्लागाराचा अनुभव तपासावे. काम गुणवत्तेमध्ये होईल याची काळजी घ्यावी. नांदेडमध्ये प्रयोग करुन नका. जिल्हाधिकारी यांनी स्वत: विष्णुपुरी जलाशयात मिळत असलेल्या नाल्याच्या पाण्याचे निरीक्षण करावे. पाण्याचे वर्गीकरण करणे, पीएच कमी करण्याचा प्रयत्न करणे याबाबत पुनश्च बैठक घेण्यात येईल, अशी सुचना दिली.
000000

  वृत्त क्र.   745   जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात भाग घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत...