Tuesday, December 2, 2025
वृत्त क्रमांक 1257
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना दिल्या भेटी
मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी साधला संवाद
नांदेड दि. 2 डिसेंबर:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिवसभर लोहा, कंधार, भोकर, उमरी आणि मुदखेड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेच्या प्रगतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे की नाही याची तपासणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. आज जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीचे मतदान शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
00000
वृत्त क्रमांक 1256
महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान
भारतात दुसरे तर महाराष्ट्रात प्रथम डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या ए.आर.टी. केंद्राचे नाव देशपातळीवर
नांदेड दि. 2 डिसेंबर :- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांनी घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आढावा मोहिमेत महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावत देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून मान मिळवला आहे. सप्टेंबर २०२५ च्या अंतिम गुणपत्रिकेत ७५ पेक्षा अधिक गुणांची नोंद करणाऱ्या 'ग्रीन झोन'मधील १६ केंद्रांपैकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे ए. आर.टी. केंद्र सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून निवडले जाऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी २०२४-२५ मध्ये अंतिम गुणपत्रिकेत एकूण १४ इंडिकेटर मध्ये ए.आर.टी. केंद्र नांदेडचे गुण ३८ होते ते एका वर्षात वाढून ७५ झाले.
• वर्ष अखेरीस ए.आर.टी. घेणारे पीएलएचआयव्ही रुग्णांचे रिटेंशन चे प्रमाण १०० टक्के कायम ठेवण्यात केंद्र यशस्वी ठरले आहे.
• वर्षाच्या अखेरीस वायरल लोड सप्रेशन रेट ९७ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.
• गर्भवती महिलांचा वायरल लोड सप्रेशन रेट ९६ टक्के ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.
हे यश ए.आर.टी. केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचा परिश्रमाचे फलित असल्याचे मत महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केले. एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी व उपचार करून जे नावलौकिक ए.आर.टी. केंद्राने मिळवले आहे, याचा लाभ सर्व एचआयव्हीग्रस्त रुग्णांनी घ्यावा व आपले स्वास्थ्य व जीवन अधिक सदृढ करावे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी केले आहे.
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उपाधिष्ठाता व विभाग प्रमुख डॉ. शितल राठोड यांचे मार्गदर्शन आणि ए.आर.टी. केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद उबेदुल्ला खान यांचा सततचा पाठपुरावा वैद्यकीय अधिकार्यांचे औषधी व्यवस्थापन नियमित आणि निरंतर रुग्णसेवा देणारे डॉ. प्रदीप जाधव आणि त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मेहनतीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला.
दि. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, श्रीमती अंबिका कुलकर्णी, प्रताप गायवाडे, मिलिंद सूर्यवंशी, अतिश बनसोडे, सतीश अचोले,प्रीतम कांबळे, दीपक कच्छवे, श्रीमती पूजा रोकडे, डॉ. फेरोज खान, आकाश निमडगे, गणेश उपासे व सर्व आय.सी.टी.सी. कर्मचारी श्रीमती सुनीता वावळे, अश्वजीत सूर्यवंशी आणि हर्षवर्धन पंडागळे यांचा समावेश होता.
याप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ संजय मोरे साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय कापसे साहेब, डॉ कपिल मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप अंकुशे आदी मान्यवर उपस्थित होते.
00000
वृत्त क्रमांक 1255
“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल
समाज बांधवानी कार्यक्रमास मोठया प्रमाणात उपस्थित राहावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड दि. 2 डिसेंबर :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजातील समाज बांधवानी या कार्यक्रमास मोठया प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
रविवार 7 डिसेंबर रोजी नागपूर येथील सुरेश चंद्र सुरी ग्राउंड, खसरा नंबर 168, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा येथे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व गुरूनानक नाम लेवा संगत सिख, सिखलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजामार्फत राज्यात नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड या तीन ठिकाणी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या अनन्यसाधारण शहीदीचे महत्व तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाजाचे श्री गुरू तेग बहादूर साहीबजी यांचेशी असलेले ऐतिहासिक नाते-संबंध अधिक दृढ होऊन राष्ट्रीय, सामाजिक व धार्मिक ऐक्य वृध्दींगत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
00000
वृत्त क्रमांक 1277 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध नांदेड (जिमाका) , दि . 5 :- जिल्हा माहिती कार्यालय , नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...




.jpeg)

.jpeg)


