Wednesday, September 17, 2025

 विशेष लेख

वृत्त क्रमांक 975

हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन 

नांदेड, दि. 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती सार्वजनिक वाचनालय, बिलोली आणि हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालय, अर्जापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व माजी आमदार अॅड. गंगाधर पटने आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर अर्जापूर येथील प्रदर्शनाचे उद्घाटन मुकींदर कुडके यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष निर्मलकुमार सुर्यवंशी हे होते. त्यांच्या हस्ते वाचनप्रेमींना प्रतीकात्मक स्वरूपात पुस्तके देण्यात आली. उद्घाटनापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या भव्य प्रदर्शनात 50 हजारांहून अधिक ग्रंथ वाचकांसाठी खुले करण्यात आले होते. इतिहास, साहित्य, चरित्र, विज्ञान, समाजशास्त्र अशा विविध विषयांवरील दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करण्यात आले. विशेष म्हणजे वाचकांना आवडते पुस्तक थेट प्रदर्शनातून घरी नेऊन वाचण्याची संधी देण्यात आली. कोणतेही शुल्क अथवा डिपॉझिट न घेता, फक्त अभिप्राय नोंदवून पुस्तक परत करण्याची ही अभिनव पद्धत राबविण्यात आली.

या वेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, सचिव निर्मलकुमार सुर्यवंशी, सहसचिव संजय पाटील, संचालक कुबेर राठोड, विविध वाचनालयांचे अध्यक्ष, ग्रंथपाल, मान्यवर तसेच पत्रकार माधव पटने व प्रा. शंकर पवार उपस्थित होते. मान्यवरांनी ग्रंथसंपदेचे कौतुक करून वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोंडावार सर यांनी केले. प्रास्ताविक वाचनालय पदाधिकाऱ्यांनी तर आभारप्रदर्शन ग्रंथपालांच्यावतीने करण्यात आले.

००००




वृत्त क्रमांक 974

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वस्थ नारीसशक्त परिवार राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ

 

स्वस्थ नारीसशक्त परिवार अभियान आरोग्य यंत्रणेने यशस्वीपणे राबवावे : पालकमंत्री अतुल सावे  

 

 नांदेडदि. 17 सप्टेंबर :-स्वस्थ नारीसशक्त परिवार या  राष्ट्रीय अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेश राज्यातील धार येथून आज करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखविण्यात आले. या निमित्ताने  नांदेड जिल्हास्तरावरील स्वस्थ नारीसशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते  जिल्हा नियोजन भवन येथे पार पडले. 

 

महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व टिमने स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान यशस्वीपणे राबवावेअशी सूचना  पालकमंत्री अतुल सावे यांनी केली.   

 

या कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेआमदार बालाजी कल्याणकरआमदार आनंदराव तिडकेजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेमुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीपोलीस अधिक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेसहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरकेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारीमहिलानागरिक आदींची उपस्थिती होती.

 

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची तज्‍ज्ञ डॉक्टारांकडून मोफत आरोग्य तपासणीसमुपदेशनउपचार केले जाणार आहे. कार्यक्रमात अवयवदानाची शपथ देण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी आरोग्य शिबिराबाबत माहिती देऊन आरोग्य शिबिराचा जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांनी लाभ घ्यावाअसे आवाहन केले. 

 

आज स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड आणि उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे झालेल्या आरोग्य शिबिरात हजार 175 महिला लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर 24 नागरिकांनी रक्तदान केले आहे. अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली. शेवटी स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. मनुरकर यांनी आभार मानले. 

0000












वृत्त क्रमांक 973

"सेवा पंधरवडा"चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ 

नांदेडदि. 17 सप्टेंबर :- राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील या कार्यक्रमाचा शुभारंभ  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जादिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाला.   

यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेआमदार डॉ. तुषार राठोडजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीपोलीस अधिक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरमहसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

या सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत सामान्य नागरिकांसाठी शासनाच्या विविध सेवा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तीन टप्यात साजरा करण्यात येत आहे. पहिला टप्पा 17 ते 22 सप्टेंबरदुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर तर तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधीत राहणार आहे. पहिल्या टप्यात रस्ते सर्वेक्षणदुसऱ्या टप्यात अतिक्रमणे नियमित करणे तर तिसऱ्या टप्यात नाविन्यपूर्ण उपक्रमात गाव तिथे दफन भूमीगायरान जमिनीची जिओ फेन्सिंग लॅण्ड बँक तयार करणेव्हॉटसॲपद्वारे तक्रार संकलन व निवारण करण्यात येणार आहे. 

व्हॉटसॲपद्वारे तक्रार संकलन व निवारण

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉटसॲप चॅटबॉट ॲटोमेशन (WhatsApp Chatbot Automation) सेवा सुरू केली आहे. या सेवेचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज नियोजन भवन येथे करण्यात आले. या सेवेमुळे नागरिकांना शासकीय माहिती व सेवा सहजसोप्या आणि वेगवान पद्धतीने उपलब्ध होत आहेत. चॅटबॉट Chatbot च्या मदतीने नागरिक 24 तास कोणत्याही वेळी कार्यालयीन कामकाजाबाबतची माहिती मिळवू शकतात. शासकीय योजनाप्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची यादीऑनलाइन अर्जाच्या लिंकअर्जाची सद्यस्थितीतसेच तक्रार नोंदविणे अशा अनेक सुविधा मोबाईलवरून थेट उपलब्ध होत आहेत.  

या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचतोकार्यालयातील गर्दी टाळली जाते आणि पारदर्शक व विश्वासार्ह माहिती सर्वांना मिळते. व्हॉटसॲप हे सर्वसामान्य नागरिकांना परिचित व सहज वापरता येणारे माध्यम असल्यामुळे ही सेवा अधिक परिणामकारक ठरते. मराठीहिंदीइंग्रजी अशा विविध भाषांमध्ये सेवा देण्याची क्षमता असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही या सुविधेचा लाभ सहज मिळतो. ही सुविधा नागरिक-केंद्रित प्रशासनाचा उत्तम नमुना ठरत असून ‘डिजिटल इंडिया’च्या उद्दिष्टपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरतेअशी माहिती यावेळी देण्यात आली. 

याप्रसंगी शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आलेले सन्मानपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 

00000








 वृत्त क्रमांक 972

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ 

नांदेड, दि. 17 सप्टेंबर :- गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

 मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ आज पिंपळगांव (म.) येथे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या अभियानाचा  राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला.

पिंपळगांव (म.) येथे आयोजित कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, सहायक जिल्हाधिकारी अनन्या रेडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.

प्र.) राजकुमार मुक्कावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दत्तात्रय गिरी, सरपंच वर्षा खंडागळे यांच्यासह गावातील नागरिक यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी शंभर दिवसाचा असून या कालावधीत गावस्तरावर अभियानाचे मुख्य सात घटक आहेत. यामध्ये सुशासन, आर्थिक स्वावलंबन, जलसमृद्धी, योजनांचे अभिसरण, संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि लोकसहभाग यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले. 

00000


















वृत्त क्रमांक 971

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

अतिवृष्टीग्रस्त बाधितांना लवकरच मदत केली जाईल -पालकमंत्री अतुल सावे

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉफीटेबल बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन 

नांदेड, दि. १७ सप्टेंबर :-  नांदेड जिल्ह्यात मागील महिण्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचे पंचनामे प्रशासनाने करुन त्यांचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासन सकारात्मक असून लवकरच बाधितांना मदत उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रारंभी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार आनंदराव तिडके, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीं, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्र्यांनी  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी होवून अनेक घरे, शेती, जनावरे, रस्ते पाण्याखाली गेली. या परिस्थीतीचे व्यापक प्रमाणात पंचनामे करुन नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पायाभुत सुविधासाठी 323 कोटी 71 लाख रुपये व शेतपिकांचे नुकसानीसाठी 553 कोटी  48 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच मदत उपलब्ध करुन देण्यात येईल असे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

जिल्ह्यात मागील महिण्यात जी अतिवृष्टी झाली यामुळे नागरिकांच्या घरात पाणी जावून 15 हजार 445 कुटूंब बाधित झाली. या बाधित कुटूंबाना 1 कोटी 13 लाख 20 हजार रुपये एवढी मदत रक्कम वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित कुटूंबाना मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे 529 जनावरे मयत झाली असून 46 लाख 92 हजार रुपयांची मदत वितरीत करण्यात आली असून उर्वरित प्रकरणाशी संबंधित वितरणाची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली.  

नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशिल असून दळणवळणासाठी शासन स्तरावर नेहमी प्रयत्न केले आहेत. नांदेड येथून नुकतीच वंदे भारत एक्सप्रेस व विमानसेवा पुर्ववत सुरु झाली आहे. यामुळे आता नागरिकांना दळणवळणाची सुविधा प्राप्त होवून उद्योग व्यवसाय व नांदेडच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथीयांना मौजे म्हाळजा येथे किन्नर भवन व स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. आतापर्यत 160 तृतीयपंथीय लाभार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली.

अर्धापूर  जिल्हा परिषद हायस्कुलचे डॉ. शेख मोहम्मद वखियोद्दीन यांना महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन 2025 चा देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला याबाबत पालकमंत्री श्री. सावे यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. 

महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ इंदौर मध्य प्रदेश येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  होणार आहे. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 कालावधीत देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय स्तरावर आयोजित केले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिला व मुलींनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन, या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने नांदेड जिल्ह्यातील माहितीवर आधारित सचित्र माहितीपूर्ण असे कॉफीटेबल बुकची निर्मिती जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. 

याचबरोबर पालकमंत्री अतुल सावे यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत व मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व अंजली नातू यांनी केले.

00000





















वृत्त क्रमांक 970

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा”

लोकअदालतीच्या धर्तीवर अपील प्रकरणे तडजोडीने निकाली काढणार

नांदेड दि. 15 सप्टेंबर :– शासन निर्णयान्वये 17 सप्टेंबर 2025 ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून उपविभागीय कार्यालयाच्या स्तरावर दाखल झालेली अपील प्रकरणे लोकअदालत मोहीमेच्या धर्तीवर तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे.

यासंदर्भात सर्व पक्षकार व त्यांचे विधीज्ञ यांना कळविण्यात येते की, आपसातील तडजोडनुसार किंवा स्वसंमतीने प्रकरणे निकाली काढावयाची असल्यास, त्यांनी स्वतः किंवा आपल्या विधीज्ञामार्फत 01 ऑक्टोबर 2025 पर्यंत लिखीत स्वरूपात निवेदन सादर करावे.

अशा प्रकारे प्राप्त झालेली निवेदने “सेवा पंधरवडा” या कालावधीत निकाली काढण्याच्या कार्यवाहीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी आपल्या अपील प्रकरणांच्या तडजोडीबाबत तपशीलवार निवेदन सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खलाळ नांदेड यांनी केले आहे.

००००

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...