Tuesday, November 4, 2025

वृत्त क्रमांक 1160  

हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

 प्रत्यक्ष खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नाफेडच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2025-26 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी एकूण 13 खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात सोयाबीन खरेदी शनिवार 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. 

मुखेड तालुका खरेदी विक्री संघ मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, कुंडलवाडी विविध कार्यकारी से. सह. सो. कुंडलवाडी, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह.संस्था (अर्धापुर), तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, बळीराम पाटील फळे व भाजीपाला सह.ख.वि.संस्था (बेरळी), मुखेड फळे व भाजीपाला सह.ख.वि. संस्था (उमरदरी), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था गणेशपूर (ता. किनवट), जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सह.संस्था (कौठा), स्वामी विवेकानंद अभिनव सह. संस्था (शेळगाव थडी) ता. धर्माबाद, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), महात्मा बसवेश्वर ग्रामीण विकास मंडळ बापशेटवाडी (मुक्रामाबाद) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन मार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. 

शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ई- पिक पाहणी अहवाल नोंद असलेला सात/बारा उतारा, आधारकार्ड व बँक पासबूक इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी. सदरील नोंदणी ही ऑनलाईन पध्दतीने POS मशीनद्वारे करण्यात येणार असल्याने नोंदणीसाठी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

000000

 


 ई-मेल संदेश दि. 4 नोव्हेंबर, 2025

 प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्‍हा 

महोदय, 

नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 01 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी   मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे उद्या बुधवार दि. 5.11.2025 रोजी सकाळी 11 वा. मा. जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. 

तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.   

पत्रकार परिषद दिनांक :-    05.11.2025(बुधवार)

वेळ                          :-   सकाळी 11.00 वा.

स्थळ                        :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

 

            स्वा/-

प्र. जिल्‍हा माहिती अधिकारी,

            नांदेड

वृत्त क्रमांक 1159

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक 1158

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या

सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिध्द

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील 27 ऑक्टोबर 2025 च्या पत्रान्वये नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 16 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. 

त्यानुसार अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी संबंधित तहसिल कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https:nanded.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 1157 

एम-सँड (कृत्रिम वाळू) उत्पादक म्हणून परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. नोव्हेंबर :- एम-सँड (कृत्रिम वाळू) धोरणाच्या अनुषंगाने 100 टक्के एम-सॅण्ड उत्पादीत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती / संस्थाकडून योजनेच्या सवलती मिळवण्याकरीता अर्ज करावयाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. एम-सॅण्ड उत्पादीत करुन इच्छिणाऱ्या व्यक्ती / संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत 2 डिसेंबर 2025 पर्यंत नव्याने सवलती मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 

शंभर टक्के एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) उत्पादित करु इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था यांनी यापूर्वीच्या प्रसिध्दी पत्रकास प्रतिसाद देऊन अर्ज सादर केला असला तरीही त्यांना या प्रसिध्दीपत्रकाच्या अनुषंगाने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. एम - सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिटसाठी अर्ज करुन ईच्छिणारे व्यक्ती पुढीलप्रमाणे असणार आहेत. अ-मंजुर खाणपट्टा असलेले. ब-तात्पुरता परवाना असलेले. क- कोणताही प्रकरचा खाणपट्टा नसलेले.

 

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 23 मे 2025 अन्वये नैसर्गिक वाळूला एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाने धोरण जाहीर केले आहे. या धोरणाची कशाप्रकारे अंमलबजावणी करण्यात येणार आहेयाबाबतची कार्यपध्दती काय असणार आहे त्याअनुषंगाने दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पत्रानुसार अंमलबजावणीबाबत कार्यपध्दती निश्चित केली आहे.

 

याद्वारे जिल्हयातील एम-सॅण्ड / (कृत्रिम वाळू) धोरणाच्या तरतुदी विचारात घेऊन 100 टक्के एम - सॅण्ड (कृत्रिम वाळू) उत्पादीत करुन ईच्छिणा-या व्यक्ती / संस्थेकडून या योजनेच्या सवलती मिळवण्याकरीता अर्ज मागविण्याची कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे. प्रसिध्दीपत्रक नोव्हेंबर 2025 रोजी केले असून सॅण्ड उत्पादीत करुन ईच्छिणाऱ्या व्यक्ती / संस्थांना अर्ज करण्याचा अंतिम मुदत 2 डिसेंबर 2025 आहे. हेतुपत्र निर्गमित करण्याचा दिनांक डिसेंबर 2025 हा आहे.

 

हेतूपत्र निर्गमित केल्यानंतर जास्तीजास्त सहा महिन्याच्या आत आवश्यक त्या सर्व परवानग्या / नाहरकत प्रमाप्रमाणत्र मिळवून तसेच MPCB कडून CTO (Consent to Operate) प्राप्त करुन 100 टक्के एम - सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट स्थापन करण्याची जबाबदारी संबंधीत व्यक्ती / संस्था यांची राहील. या कालावधीत हे युनिट स्थापन न झाल्यास हेतूपत्र आपोआप रद्द होईल.

 

या कार्यपध्दतीनुसार ज्या व्यक्ती / संस्था यांना हेतूपत्र देण्यात आले असेल केवळ अशा व्यक्ती / संस्था यांनाच महसुल व वन विभागाच्या 23 मे 2025 च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.मध्ये नमुद केल्यानुसार शासनाच्या उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाकडून दिले जाणारे गुंतवणूक प्रोत्साहन अनुज्ञेय असेल. अ-औद्योगिक प्रोत्साहन अनुदान. ब-व्याज अनुदान. क-विद्युत शुल्कातून सुट. ड-मुद्रांक शुल्क माफी. इ-वीज दर अनुदान.

 

पात्र एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनीटधारक यांची नावे व इतर तपशील नमुद करुन याबाबतचे स्वतंत्र प्रमाणपत्र उद्योग विभागास निर्गमित करण्यात येईल. तथापि मुद्रांक शुल्क वगळता या सवलती 100 टक्के एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) उत्पादन सुरु केल्याच्या दिनांकापासून लागू राहतील. अशा सवलती प्राप्त झालेल्या व्यक्ती, संस्था यांनी 100 टक्के कृत्रिम वाळू उत्पादन बंद केल्यास आपोआप या सवलती लागू होणे बंद होईल.

 

शंभर टक्के एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) उत्पादन करण्यात येत आहे किंवा कसे व उत्पादन होणारी एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) ही विहीत गुणवत्तेनुसार होत आहे किंवा नाही याची पडताळणी संबंधीत यंत्रणेमार्फत करण्यात येईल. याव्यतिरीक्त 100 टक्के एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) उत्पादन करणाऱ्या खाणपट्टाधारक यांना महसुल व वन विभागाच्या 23 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या परिच्छेद 7 (ix) मध्ये नमूद केल्याप्रमाणे स्वामित्व धानातून 400 ब्रास प्रती ब्रास इतकी सवलत देण्यात येईल.

 

हे धोरण अस्तित्वात येण्यापूर्वीच काही व्यक्ती / संस्था यांनी एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू)चे उत्पादन सुरु केले असल्याचे व आवश्यक कागदपत्रासह अर्ज केल्यास सदर युनिट धारकास हेतूपत्र निर्गमित करण्यात येईल. सदर हेतूपत्र निर्गमित केल्याच्या दिनांकापासून महसूल व उद्योग विभागाच्या सवलती लागू करण्यात येतील. एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिट करीता लागणाऱ्या गौण खनिजाच्या स्त्रोत बदलबाबतची माहिती सादर करणे आवश्यक आहे. सदर स्त्रोतामध्ये बदल करावयाचा असल्यास एक महिना अगोदर लेखी कळवून व मान्यतेने असा बदल करता येईल.

 

एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) व्यतिरीक्त सदर गौण खनिजाचा वापर इतर उपउत्पादनासाठी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास हेतपूत्र रद्द करुन उद्योग विभागाच्या सवलती बंद करण्यात येतील व खाणपट्टाधारक यांच्यावर महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास व विनियमन 2013 च्या अंतर्गत बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. विहित नमुद केलेले आवश्यक कागदपत्रासह विहीत मुदतीत नव्याने अर्ज करुन कृत्रिम वाळू धोरणाच्या अनुषंगाने सवलती मिळण्यासाठी अर्ज करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक 1156

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांनी

मिनी ट्रॅक्टर उपसाधने पुरवठा या योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. 

या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये शासन स्तरावरुन निश्चित केल्या आहे. सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी  सन 2025-26 करीता http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...