वृत्त क्रमांक 639
शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये
सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश
नांदेड, दि. १९ जून :- महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजन, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनी च्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातुन जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अदयावत क्रीडा सुविधा पूरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत.
सन 2025-26 साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर 06 क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (50 टक्के) व कौशल्य चाचणी (50 टक्के) प्रक्रियेअंतर्गत पुढील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रवेश प्रक्रीयासाठी खालील प्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.
1) क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे–
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.
2) क्रीडा प्रबोधिनी मधील क्रीडा प्रकार–
ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबलटेनिस, वेटलिफटींग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा 17 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. परंतु, सन 2025-26 मध्ये खालील 6 खेळांचे (1), व्हॉलीबॉल-13 खेळाडू रिक्त पदे, 2) सायकलिंग-03 खेळाडू रिक्त पदे, 3) जलतरण-07 खेळाडू रिक्त पदे, 4) फुटबॉल-07 खेळाडू रिक्त पदे, 5) ज्युदो-05 खेळाडू रिक्त पदे, 6) जिम्नॅस्टिक्स-09 खेळाडू रिक्त पदे) याच खेळाडूंनी अर्ज भरण्यात यावेत याची नोंद घ्यावी.
3) प्रवेश प्रक्रिया सरळप्रवेश व कौशल्य चाचणी –
· सरळ प्रवेश प्रक्रीया – क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना सबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केलाजातो.
· खेळनिहाय कौशल्य चाचणी – क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या सबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षे आतील आहे अशा खेळाडूंना सबंधीत खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
· वैद्यकीय चाचणी – उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनी मध्ये शारीरिकदृष्टया सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येत आहे.
4) जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर चाचण्या आयोजित करताना करावयाची कार्यवाही-
अ) जिल्हास्तर –
1) आपल्या शाळेच्या/ संस्थेच्या/ संघटनेच्यावतीनेजिल्हा, विभाग व राज्यक्रीडाप्रबोधिनीचाचण्यांबाबतमाहितीसर्वांनाअवगतकरण्यातयावी.
2) जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणी साठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नांवे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे नोंदणी करण्यात यावी. खेळाडूंचे नांव, जिल्हा, खेळ प्रकार, जन्म दिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडे 24 जून,2025 पर्यंत सादर करावीत.
1) विभागस्तरावर कौशल्य व सरळप्रवेश चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
2) विभागीय उपसंचालक कार्यालय यांचे कडून लवकर कळविण्यात येईल.
सन 2025-26 प्रवेश प्रक्रिया क्रीडा कौशल्य व सरळ प्रवेश चाचणी वयोमर्यादा
चाचणी प्रकार- सरळ प्रवेश यामध्ये खेळ- हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स व कौशल्य चाचणी यामध्ये खेळ- हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स याखेळाचा समावेश आहे. विभागीय चाचणी वयोमर्यादा (वयोगट) 7 जुलै 2006 नंतर जन्मलेलले व 8 जुलै 2025 रोजीपर्यंत 19 वर्षे पुर्ण झालेले खेळाडू.
1) राज्यस्तर चाचणी सरळ प्रवेश खालील वेळापत्रकाप्रमाणे आयोजित करण्यात आलेली आहे.
v सरळ प्रवेश खेळ प्रकार- हॅन्डबॉल चाचणी 5 ते 6 जुलै,2025 खेळाडूंची उपस्थिती 5 जुलै,2025 रोजी सकाळी 10 वा. स्थळ- क्रीडा प्रबोधिनी, नागपूर, खेळ प्रकार- जलतरण, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, सायकलिंग चाचणी 05 ते 06 जुलै,2025 खेळाडूंची उपस्थिती 05 जुलै,2025 रोजी सकाळी 10 वा. स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे- 45
v कौशल्य चाचणी खेळ प्रकार- हॅन्डबॉल चाचणी 7 ते 8 जुलै, 2025 खेळाडूंची उपस्थिती 7 जुलै,2025 रोजी सकाळी 10 वा. स्थळ- क्रीडा प्रबोधिनी, नागपूर, खेळप्रकार- जलतरण, ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, फुटबॉल, सायकलिंग चाचणी 07ते 08 जुलै,2025 खेळाडूंची उपस्थिती 7 जुलै, 2025 रोजी सकाळी 10 वा. स्थळ- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे- 45
या कार्यक्रमात 06 क्रीडा प्रकाराकरीता (हॅन्डबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो व जिम्नॅस्टिक्स) सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रक्रियेद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
3) क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळाडूंच्या रिक्तपद संख्या –
राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये खेळनिहाय रिक्त पदांची रिक्त संख्या तसेच खेळाडूंची क्षमता, कौशल्य विचारात घेवून प्रवेश देण्यात येईल. निवडण्यात येणा-याखेळाडूंनाराज्यातीलकोणत्याहीक्रीडाप्रबोधिनीमध्येप्रशिक्षणस्थळहेक्रीडासंचालनालयस्तरावरनिश्चितकरण्यातयेईल. त्यानुसारप्रवेशसबंधितक्रीडाप्रबोधिनीमध्येघेणेआवश्यकराहील.
सर्वसाधारण सूचना - सदर चाचण्यांसाठी येणाऱ्या खेळाडूंनी स्वत: निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे तसेच सदर चाचण्यांकरीता येणा-या खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य/ सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, आधारकार्ड इत्यादी मूळ कागदपत्रे चाचणी स्थळी आणणे बंधनकारक आहे.
यासाठी या कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर प्रसिध्दी व अर्ज संकलन करणेकरीता जिल्हयातील खेळाडूंनी आपले विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे ( क्रीडा प्रमाणपत्रे,/ आधार कार्ड/ जन्म दाखला इत्यादी) माहितीसह अर्ज 24 जुन,2025 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे सादर करावेत. व अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
०००००