वृत्त क्रमांक 851
समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने मंगळवारी यशवंत महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन
नांदेड दि. 14 ऑगस्ट :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वा. यशवंत महाविद्यालय, बाबानगर नांदेड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेसाठी प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना राबविण्यात येतात. तसेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झालेले आहे.
00000
No comments:
Post a Comment