Thursday, September 11, 2025

वृत्त क्रमांक 949 

श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरात 17 हजारांवर रुग्णांची आरोग्य तपासणी


·  नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सवात घेण्यात आली 314 समुदाय आरोग्य शिबिरे 

नांदेड, दि. 11 सप्टेंबर :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या पुढाकाराने श्री गणेशा आरोग्याचा या अभियानांतर्गत समुदाय आरोग्य शिबिरांना नांदेड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत नांदेडमध्ये एकूण 314 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यात 17 हजार 444 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली त्यात 7 हजार 263 पुरुष, 6 हजार 910 महिला,  1 हजार 726 लहान मुले व 1 हजार 545 लहान मुलींचा समावेश होता. या शिबिरात विविध तपासण्या आणि उपचार करण्यात आले. यामध्ये एकूण 2 हजार 187 तपासण्या झाल्या. तसेच 253 रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली. 

आयुष्मान भारत कार्ड्सची निर्मिती

श्री गणेशा आरोग्याचा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देऊन जनजागरण करण्यात आले. त्यामध्ये विशेषत: मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्मान भारत योजनेची माहिती देऊन कार्ड्स काढण्यावर भर देण्यात अला. एकूण 1 हजार 597 रुग्णांचे कार्ड्स काढण्यात आले. त्यामुळे त्यांना भविष्यात मोफत किंवा सवलतीच्या दारात उपचार मिळण्यास मदत होईल. 

सहभागातून यशस्वी उपक्रम

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने स्थानिक गणेश मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संलग्न रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्न रुग्णालये, सर्वाजनिक आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्यवर्धिनी केंद्रे, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी सक्रीय सहभाग घेतला.

0000



No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...