Monday, June 30, 2025

वृत्त क्र. 675

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना 

नांदेड, दि. 30 जून :- केंद्र व राज्य शासनाच्या ड्रग मुक्त मोहिम, नशामुक्त भारत अभियान अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती मिळावी व हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांचेकडून जिल्हा समन्वयक, नशाबंदी मंडळ हे सहकार्य करणार आहे. 

नशाबंदीबाबत जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करणार आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात दंतशल्यचिकित्सा विभागामधील तंबाखू प्रतिबंध केंद्रामध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना 28 जून रोजी करण्यात आली. या केंद्राचे उदघाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उप अधिष्ठाता डॉ. वाय.एच.चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, दंत शल्य चिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांचेसह डॉ. सुशील येमले, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांच्यासह निवासी डॉक्टर्स, परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण व रुग्ण नातेवाईक हे उपस्थित होते. 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना झाल्यामुळे व्यनाधीन व्यक्तीना, शारिरीक, मानसिक आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होईल आणि केंद्राच्या माध्यमातून त्या व्यक्तींना व्यसनातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन, उपचार व प्रेरणा मिळेल. या केंद्रामुळे व्यसनाबाबत समाजामध्ये जनजागृती होवून व्यसनमुक्त व सक्षम समाज निर्माण होईल अशी भावना अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केली.   

 00000




No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   1145 दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एकता रॅलीत जनजागृती साहित्याचे वाटप  माहूर तालुक्यात विविध उपक्रमाद्वारे जनजागृती   नांद...