Tuesday, June 24, 2025

वृत्त क्र. 652

प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत 

किनवट पंचायत समिती येथे कार्यशाळा संपन्न

नांदेड दि.२३ जून:- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला,उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्रीमती मंजुषा कापसे, ज्ञानेश्वर टाकरस गटविकास अधिकारी किनवट, प्रदीप नाईक सहाय्यक प्रकल्प अधिकारी, रामेश्वर मुंडे तहसीलदार किनवट यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी किनवट, माहुर, हिमायतनगर,भोकर, हदगाव, उमरी, धर्माबाद,मुखेड, मुदखेड, येथील तहसिलदार,गटविकास, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना सर्व जनजाती कुटुंबांचे आॕनलाईन सर्वेक्षण तात्काळ सुरू करुन विविध योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी यांना लाभ देण्यासाठी व विविध प्रकारचे दाखले/प्रमाणपत्रे देण्यासाठी आदेशीत केले. आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक भावनेतून काम करण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांना आव्हान केले.तर यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी या अभियानाबाबात मार्गदर्शन केले.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी  विस्तार अधिकारी वसंत वाघमारे  , कैलास गायकवाड, राजेश मॅकलवार यांनी परीश्रम घेतले.

०००००









No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...