Saturday, March 22, 2025

 वृत्त क्रमांक 322

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत 

नांदेड दि. 23 मार्च  :- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मंत्री नवाब मलिक यांचेही आगमन झाले. 

यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 






यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य उत्पादन शुल्कचे नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. बी.एच.तळवी, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आणि विविध पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत.


00000

 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना






 समाज कल्याण संस्थांना अनुदान (समाजकार्य महाविद्यालय)



वृत्त क्रमांक 321 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 22 मार्च :- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार हे रविवार 23 मार्च 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

रविवार 23 मार्च 2025 रोजी बारामती विमानतळ येथून विमानाने सकाळी 10.15 वा. श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वा. मोटारीने नायगाव तालुक्यातील नरसी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.40 वा. नायगाव येथे शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. मोटारीने स्वागत लॉन्स सांगवी विमानतळ रोड नांदेड येथे आगमन. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ग्रामीण, शहर जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार यांची बैठक. त्यानंतर सायं 6.30 वा. मोटारीने हैदरगार्डन देगलूर नाका नांदेड येथे आगमन व इफ्तार पार्टी कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7.55 वा. मोटारीने श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. रात्री 8 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील व रात्री 8.50 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नं. 8 मुंबई येथे आगमन होईल.

0000



Friday, March 21, 2025





 #जागतिकवनदिवस #जागतिक_वन_दिन

जागतिक वन दिनानिमित्त वने आणि वसुंधरेच्या संवर्धनाचा करुया संकल्प..

 वृत्त क्रमांक 320

केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम

नांदेड, दि. २१ मार्च:-  दु.१.२४ वाजताची वेळ ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय अंतर्गत ज‍िल्‍हा आपत्‍तकालीन कार्य केंद्रात फोन, धर्माबाद येथील एका रसायन कंपनीत केमीकल ल‍िकेजची घटना घडली असून परिस्‍थिती हाताळण्‍यासाठी मदत करावी असा दुरध्‍वनी संदेश कंपनीकडून आला.

आणि ज‍िल्‍हा आपत्‍कालीन कार्य केंद्रातील कर्तव्‍यावरील कार्यरत कर्मचारी ही बाब लगेचच दौ-यावर असलेल्‍या ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांना कळव‍िले . परीस्‍थ‍िती लक्षात घेता तात्‍काळ ज‍िल्हाध‍िकारी व न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी यांच्‍याशी चर्चा करुन एनडीआरएफ पथकाला या आपत्‍तीपासून बचाव करण्‍याकामी पाचारण करण्‍याचे ठरले.

तात्‍काळ एनडीआरएफ  पुणे येथील ५ नं.बटालीयनला संर्पक साधुन तात्‍काळ पाचारण केले. तोपर्यत स्‍थानीक अग्‍नीशमन पथक मनपाचे व एम.आय.डी.सी.चे अग्‍नीशमन अध‍िकारी हे तेथील पर‍िस्थित न‍ियंत्रणात आणन्‍याचा शर्तीने प्रयत्‍न करत होते.  यांच्‍यासोबत कंपनीचा सुरक्षा व‍िभागही प्रयत्‍न करत होता. 

उपव‍िभागीय अध‍िकारी,तहस‍िलदार, गटव‍िकास अध‍िकारी, मुख्‍याध‍िकारी व आरोग्‍य अध‍िकारी हे आपल्‍या पथकासह समन्‍वय साधुन घटनास्‍थळी हजर होते. एन.डी.आर.एफ.च्‍या केमिकल आपत्‍ती पासुन बचाव करणा-या पथकाचे आगमन झाले त्‍यांना स्‍थानीक प्रशासन व व‍िव‍िध यंत्रणांच्‍या मदतीने अचुक केमिकलची माहिती घेऊन काही वेळात ही टॅकरमध्‍ये केमिकल भरतांना ल‍िकेजमुळे लागलेली आग आटोक्‍यात आणली. लगेचच यादरम्‍यान जखमी झालेल्‍यांना कंपनीच्‍या रुग्‍णवाहीकेतून उपचारासाठी नेण्‍यात आले. अशा प्रकारे ही केमिकल आपत्‍ती मध्‍ये आपत्‍तीचे निवारण शोध व बचाव कार्य कसे करायचे एकंदरीत आपत्‍तीचे व्‍यवस्‍थापन कसे करायचे याबाबतचा सराव अभ्‍यास सर्व यंत्रणाच्‍या व एन.डी.आर.एफ.च्‍या सहकार्याने ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड यांनी हा रंगीत तालीम-सराव अभ्‍यास घडवून आणला.

२० मार्च २०२५ रोजी युनायटेड स्‍प‍िरीट ल‍ि.बाळापूर ता. धर्माबाद ज‍ि. नांदेड येथे  एनडीआरएफ 5 न. पुणे यांच्‍या सहकार्याने ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेडच्‍यावतीने ज‍िल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष राहुल कर्ड‍िले, न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी तथा मुख्‍य कार्यकारी अध‍िकारी जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कु-हे यांनी ही केमिकल आपत्‍ती बाबत टेबल टॉक व मॉक एक्‍सरराईज  दोन सत्रामध्‍ये सकाळी १०.३० ते दु.४.३० या दरम्‍यान घडवून आणली. 

यावेळी धर्माबाद च्या उपविभागीय अधिकारी स्‍वाती दाभाडे, तहसीलदार सुरेखा स्वामी, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य ध‍ि.रा.खिरोडकर उपसंचालक, एनडी आरएफ निरीक्षक बृजेश कुमार रेंकवार, अग्नीशमन अधिकारी डी.एन.गायकवाड , न‍िलेश कांबळे, आडळकर ए.आर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क, पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे, कंपनीचे प्रकाश बोदडे,सुदीप त‍िवारी ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणाचे गौरव त‍िवारी, बारकुजी मोरे व धर्माबाद उपव‍िभागील धर्माबाद, उमरी येथील नगर परीषद, पंचायत समिती, अग्‍नीशमन, पोलीस, आरोग्‍य व इतर सर्व यंत्रणांचे अध‍िकारी कर्मचारी यांची उपस्‍थ‍िती होती.

00000










 वृत्त क्रमांक 319

बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार

मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हयाधिकाऱ्यांकडून कौतुक

नांदेड दि. 21 मार्च : नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे.अशावेळी सातत्यपूर्ण 15 वर्ष मेंदूचे विकार असलेल्या बौद्धीक अक्षम मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार 20 मार्च रोजी प्रारंभ झाला. पुढील दोन दिवस हे शिबीर चालणार आहे. 

आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड व विविध मान्यवरांनी आरोग्य शिबिरास भेट देवून माहिती घेतली. यावेळी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, डॉ. सुरेश दागडीया, अंकित अग्रवाल, कुणाल मालपाणी, गोवर्धन बियाणी, द्वारकादास साबू, नारायण कलंत्री, रयत रुग्णालयाचे कोषाध्यक्ष सुधिर चिंतावार, नेरली कुष्ठधामचे सहसचिव एम. आर. जाधव व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांची उपस्थिती होती.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राजस्थानी शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहे. यापुढेही आरोग्य शिबिराची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होऊन अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले यांनी दिली. 

दोन दिवसात जवळपास 500 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नियोजनात आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व रामप्रताप मालपाणी मुक बधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ होत आहे. हे आरोग्य शिबीर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तर त्यांच्या पालकात समाधान व्यक्त करणारे ठरले आहे.

टीम डॉ. अनैता हेगडेंचे कार्य प्रशंसनीय - डॉ. सचिन खल्लाळ

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अनैता हेगडे, डॉ.अवि शहा व डॉ.आशा चिटणीससह 35 डॉक्टरांची टीम सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत रुग्णांवर मोफत तपासणी व  उपचार करीत आहे.समाजाचे देणे लागतो याभावनेतून केलेले हे कार्य प्रशसनीय असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा मुलांसोबत वाढदिवस 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज या शिबिराला भेट दिली.या ठिकाणी उपस्थित पालक,मुले यांच्याशी चर्चा केली. देशातील तज्ञ डॉक्टर आज या ठिकाणी त्यांच्या तपासणीला आले होते. अशा मुलांसाठी आपण जिल्हास्तरावर काय करू शकतो, या संदर्भातही त्यांनी यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा केली. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची देखील त्यांनी चर्चा केली. आपल्या वाढदिवसाला या मुलांसोबत काही वेळ घालवता आला याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

00000







केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...