Tuesday, February 7, 2023
वृत्त क्रमांक 60
वृत्त क्रमांक 59
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 7 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय या शासकीय आरोग्य संस्थेच्या माध्यमातून गुरूवार 9 फेब्रुवारी 2023 रोजी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, “जागरूक पालक तर सदृढ बालक” तसेच “हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमानंतर आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत येणाऱ्या रुग्णांची बिपी, शुगर, नेत्र तपासणी (डायबेटीक रेटीनोपथी) सर्व प्रकारचे कर्करोगाशी संबंधित तपासणी, बाल आरोग्य इत्यादी संदर्भात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यांतर्गत सर्व गरजू रुग्णांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 58
ज्येष्ठांप्रती आदराच्या भावनेसाठी प्रत्येक शालेय कार्यक्रमात ज्येष्ठांचा सन्मान
Monday, February 6, 2023
वृत्त क्रमांक 57
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड
(जिमाका) दि. 6 :- डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र विद्यार्थ्यांनी आपला अर्ज 10
फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन
भरुन कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड
येथे समक्ष सादर करावा. या योजनेचा लाभ
घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://www.syn.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी दि. 13 जुन 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी खर्चाची बाबीत भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार रूपये एवढी आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अनुज्ञेय रक्कम आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येतो.
सदर योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेशित नसावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी/ अकरावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही.
विद्यार्थ्याने
खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंव्हा शैक्षणिक अभ्यासक्रम
पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यावसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ
घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या
रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले / आवश्यक कागदपत्र सादर
न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे
कळविण्यात येणार नाही, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी
केले आहे.
00000
Friday, February 3, 2023
वृत्त क्रमांक 56
लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 3 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 6 फेब्रुवारी 2023 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
या दिवशी महसूल, जिल्हा पोलिस अधीक्षक , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, परि
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतीमध्ये असावा (नमुना प्रपत्र 1 ते 1 ड) तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी मााहिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
00000
वृत्त क्रमांक 55
जिल्ह्यातील 18 वय वर्षे पर्यंतच्या दहा लाख
मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी
· जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत नियोजन
नांदेड (जिमाका) दि. 3 :- शुन्य ते 18 वय वर्षे वयापर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सुमारे 10 लाख मुला-मुलींची तपासणी होणार असून आरोग्य विभागासह, शिक्षण, वैद्यकिय महाविद्यालय, महिला व बालकल्याण, आयुर्वेदिक महाविद्यालय, मनपा, इंडियन मेडिकल असोसिएशन, पेडियाट्रिक्स असोसिएशन व इतर संबंधित विभागांची आज आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. निना बोराडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सलीम तांबे, डॉ. शिवशक्ती पवार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डॉ. मनिष देशपांडे, डॉ. राजेश बुदे, डॉ. लोमटे, डॉ. दिपेश शर्मा आदी उपस्थित होते.
या मोहिमेसाठी सुमारे 300 वैद्यकीय तपासणी पथक तयार करण्यात आले असून उपलब्ध मनुष्यबळ व जिल्ह्यातील आरोग्य सेवा-सुविधा यांचा यात अंर्तभाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 317 उपकेंद्रे, 68 प्राथमिक आरोग्य केंद्र, 12 ग्रामीण रुग्णालय, 6 उपजिल्हा रुग्णालय, 3 जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, 15 प्राथमिक आरोग्य केंद्र याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन, पेडियाट्रिक्स असोसिएशन व इतर संस्थांचाही यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे.
शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी शाळा, आश्रमशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या आदी ठिकाणावर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. यात वजन, उंची, गरजेनुसार विद्यार्थ्यांचा रक्तदाब, नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, हृदयरोग, कुष्ठरोग, दंत विकार, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी, जन्मजात मोतिबिंदू, बहरेपणा, दुभंगलेले ओठ, डाऊन सिंड्रोम डिफेक्ट, न्युरल ट्युब डिफेक्ट अशा आजाराच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित उपचारासाठी संदर्भीत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
तीनस्तरावर ही आरोग्य तपासणी केली जाणार असून यात ज्या मुलांना बाहेरच्या उपचारांची गरज अत्त्यावश्यक असेल अशा मुला-मुलींवर मेडिकल असोसिएशनचे तज्ज्ञ आपली सेवा उपलब्ध करून देणार आहेत. सर्व तपासणीमध्ये कुणाला उच्च स्तरीय उपचार शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर अशा पालकांना करारबद्ध करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये संदर्भीत केले जाणार आहे.
“भविष्यात उग्र स्वरूप अथवा घातक ठरणाऱ्या आजारांवर वेळीच निदान करून उपचार करणे आवश्यक असते. असंख्यवेळा लहान मुले आपल्याला नेमके काय होते याबाबत कोणाशी बोलत नाहीत. त्यांच्या पालकांचेही बालकांच्या ज्या काही आरोग्य समस्या असतील त्याकडे वेळेवर लक्ष वेधले जाईल असे होत नाही. हे लक्षात घेता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे जिल्ह्यातील 18 वय वर्षे गटापर्यंतच्या सर्व मुलांची आरोग्य तपासणी जिल्ह्यात पूर्ण केली जाईल. ही प्राथमिक तपासणी जिल्ह्यात 7 हजार 727 शाळा व इतर ठिकाणी करून यातील तात्काळ उपचाराची गरज असलेल्या मुलांवर पुढील तपासण्या करून त्वरीत उपचार करून देऊ.”
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
“अत्यंत महत्त्वपूर्ण व आवश्यक अशा या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशनला सहभाग घेण्याची मिळालेली संधी म्हणजे आम्ही आमचा सन्मान समजतो. शासकीय रुग्णालयांमध्ये या तपासणी मोहिमेतील बालकांना पुढील अत्यावश्यक तातडीने जे काही उपचार करावे लागले तर त्यासाठी आम्ही आमचा वेळ या कामांसाठी निश्चित देऊ.”
- डॉ. मनिष देशपांडे, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन.
*******
Thursday, February 2, 2023
वृत्त क्रमांक 54
महात्मा गांधी व्यसनमुक्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 2 :- महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनवर्सन योजनेंतर्गत व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्याबाबतची योजना सुरु करण्यात आली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी त्यांचा प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 5 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 10 मार्च 2017 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.
00000
केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 140 प्रतिबंधात्मक कारवाया; 10 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त नांदेड, दि. 10 जून : जिल...

