Tuesday, January 17, 2023

वृत्त क्रमांक 31

 प्रत्येकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश आवश्यक

-         जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

§  संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून दरवर्षी होणार साजरा

नांदेड (जिमाका) दि. 17 :-मानवी जीवनात तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. पौष्टिक तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा हे पिके येतात. या तृणधान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन इ. पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशिर असून याचा प्रत्येकांच्या आहारात समावेश अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


पौष्टिक तृणधान्य दिन अधिक व्यापक व्हावा यासाठी जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून तृणधान्य व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाची विक्री व जन जागृतीवर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेचा कृषि विभाग, महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून याबाबत अधिक व्यापक उपक्रम घ्यावेत, असे आवाहन वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. आज जिल्हा परिषदेत पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. 


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय तुबाकले, कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमूख व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. तर दृरदृश्यप्रमालीद्वारे जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका महिला व बालविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

  

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाने संक्रांत-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून कायमस्वरुपी साजरा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी तृणधान्याचे आहारातील महत्व सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांनी केली.

 00000





विभागीय माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध

 लातूर, दि.17(विमाका):- विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, त्यांनी त्यांचे लिफाफाबंद दरपत्रक मा. उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दि. 25 जानेवारी 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील .

          रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील .

***

वृत्त क्रमांक 30

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान

मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 17 :-05 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेच्यावतीने मत नोंदविण्यासाठी मतदारांना आवश्यक त्या सुचना निर्गमीत केल्या आहेत.

               मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी सूचना

मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन यांचा वापर करु नये. ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे, त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Order of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात “1” हा अंक नमूद करुन मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी “1” हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार “पसंतीक्रम” (Order of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा. कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमूद करु नये. पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3 इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये. अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन स्वरुपातील I,II,III इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसूचितील भारतीय भाषेतील अंकांच्या स्वरूपात नोंदविता येतील. मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर (√) किंवा (×) अशी खुण करु नये, अशी मतपत्रिका बाद ठरेल. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर “1” हा अंक नमूद करुन तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांनी मतदान करतांना या सूचनांचे पालन करुन आपले मतदान अवैध ठरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 5- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ यांनी  केले आहे.

000000

Monday, January 16, 2023

 विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत

उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक

                   औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुक लढविणाऱ्या उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत आज झाली.

                   औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 30 जानेवारी रोजी व मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी ही बैठक झाली.

                   उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींसह निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनियार उपस्थित होते.

                   शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम, नियमावली, मतदान, मतमोजणी, तारखा व वेळा, मतदार यादी, प्रचार साहित्य छपाई निर्बंध, मतदान केंद्रे, उमेदवार तसेच प्रतिनिधीचे ओळखपत्र, निवडणूक आयोगाचे निर्देश, आदींबाबत श्री.केंद्रेकर यांनी माहिती दिली. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. माहितीसाठी मार्गदर्शिकेचेही वितरण यावेळी करण्यात आले. 

*****







 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ

एका उमेदवाराची निवडणुकीत माघार, 14 उमेदवार रिंगणात

 

                  औरंगाबाद, दि.16, ( विमाका) :-  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.

 

                  डॉ.गणेश वीरभद्र शेटकर - अपक्ष या एका उमेदवाराने शिक्षक मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे.

                  काळे विक्रम वसंतराव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव - भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव - वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील - अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) - अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख - अपक्ष, कादरी शाहेद अब्दुल गफुर - अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी - अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके - अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील - अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर - अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव - अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे - अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे - अपक्ष असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

                  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने (भा.प्र.से.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक - 8956710497 तर दुरध्वनी क्रमांक - 0240-299801 असा आहे. 

 

*****

वृत्त क्रमांक 29

 उद्योग सुलभता कार्यशाळेचे बुधवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- उद्योग विभाग, मैत्री विभाग व जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने  जिल्ह्यातील उद्योजकांसाठी उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकुल वातावरणात चालना मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथे बुधवार 18 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वा. कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.  

 

या कार्यशाळेचा उद्देश व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणाविषयी आणि वापरकर्त्यांकडून अभिप्राय मागविण्यासाठी मैत्री मुंबई यांची कार्यरत सल्लागार टीम इज ऑफ डुइंग बिजनेस सुधारणेबाबत कार्यशाळेत सादरीकरण करणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, सनदी लेखापाल, सनदी वास्तुरचनाकार, इंजिनिअर्स तसेच उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभागांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000 

वृत्त क्रमांक 28

 राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

महिला हेल्मेट रॅली संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्थिती होती.

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयात विविध रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिलांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट वापर करावा यासाठी महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. अपघाताची संख्या कमी करण्याबाबत जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात सर्व नागरिकांनी वाहतूक नियमावलीचे पालन करुन सहकार्यातून अपघात मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.

 

ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदीर, शिवाजीनगर, राज कॉर्नर, एस.टी.वर्कशॉप, येथून आयटीआय पर्यंत होता. या रॅलीत  सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी सुमारे 60 महिला या पोलीस विभागातील होत्या. रॅलीच्या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहा,मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. रॅलीसाठी मोटार वाहन वितरक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांनी सहकार्य केले.

00000





केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...