Thursday, November 4, 2021

 मध्य सप्तकातील गोदावरीच्या प्रवाहाला

तार सप्तकातील सुरांची जेंव्हा साथ मिळते ! 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व दिवाळीच्या औचित्याने

गोदावरीच्या काठावर “दिवाळी पहाट” चा शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- गत दोन वर्षे अनेक आव्हानांशी झुंजणाऱ्या जीवनमानाला सर्वांच्याच दक्षतेने सुरक्षित आरोग्याची शाश्वती आल्याने जनजीवन पूर्ववत होऊ पाहत आहे. कोरोनाच्या आव्हानावर मात करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनीही दक्षता घेऊन सक्रिय साथ दिल्याने बहुप्रतिक्षेत असलेल्या “दिवाळी पहाट”च्या सुरांनी आज गोदावरीचा काठही क्षणभर थबकला.   

जिल्हा प्रशासन, गुरुद्वारा बोर्ड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व रसिक नागरी सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज पहाटे 17 व्या दिवाळी पहाट सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ झाला. विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शंतनू डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने ही सुरांची मांदियाळी सुर्योदयाच्या साक्षीने सुरु झाली.    

महाराष्ट्राला वैचारिक, सांस्कृतिक अधिष्ठान देणाऱ्या नांदेडमध्ये सर्व सांस्कृतिक प्रेमी व प्रशासनाने एकत्र येऊन सन 2005 पासून “दिवाळी पहाट” ची नवी नांदी सुरू केली. कोरोनामुळे गत दोन वर्षांचा व्यत्यय सोडला तर हा महोत्सव गोदावरीचा काठावर 16 वर्षांपासून अव्याहत वाहतो आहे. निसर्गत:च ऊब घेऊन असलेल्या गोदावरीच्या कुशीतील या रम्य पहाटेच्या प्रतीक्षेत वर्षभर प्रत्येकजण असतो. आज 4 नोव्हेंबर रोजी सुरू झालेली ही रम्य पहाट तेवढीच उबदार व अल्हाददायक झाली ती कवी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार आश्वासक सूत्रसंचालनाने. 

डिजिटल माध्यमांमुळे मानसे कितीही जुळल्या गेली तरी त्या भेटीत नेमका सुर गवसेलच असे नाही. मैफिलित सूर प्रत्यक्ष भेटीला येतात. सोळावं वर्षे धोक्याचं याची प्रचिती या महोत्सवालाही आल्याचे आपण अनुभवले, अशी मिश्कील टिप्पणी कार्यक्रमाचे संचलन करणारे डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी करुन सकाळच्या या वातावरणाला आणखी ऊबदार केले. प्रेमातील ऊर भेटीपेक्षा सूर भेटी या अधिक उभारी देणाऱ्या असतात. कोरोनातून सावरतांना विश्वासार्हतेबरोबर जी स्वसुरक्षिततेची, स्वजबाबदारीची भावना आवश्यक आहे त्या भावनेला गुंफत डॉ. मुलमुले यांनी या पहाटेलाही जबाबदारीचे भान दिले.   

राग भूप मधील पूर्वेच्या देवा तुला सूर्य देव हे नाव या गितापासून माझे जीवनगाने, धुंदी कळ्यांनो, ऋणानुबंधाच्या... ते निघालो घेऊन दत्ताची पालखी पर्यंत एकावर एक अशी सरस गानी प्रख्यात गायक संजय जोशी यांनी  सादर केली. त्यांना औरंगाबादच्या वर्षा जोशी यांनी साथ दिली. संगित साथ  जगदीश देशमुख, भार्गव देशमुख, स्वरुप देशपांडे, स्वरेश देशपांडे, शेख नईम यांनी दिली. 

ही “दिवाळी पहाट” रसिक नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शंतनू डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मण संगेवार, सुरेश जोंधळे, ॲड गजानन पिंपरखेडे, विजय बंडेवार, बापू दासरी, उमाकांत जोशी, विजय जोशी, सुनील नेरलकर, विजय होकर्णे, वसंत मैय्या, हर्षद शहा, चारुदत्त चौधरी, रत्नाकर अपस्तंभ, प्रमोद देशपांडे, डॉ. भरत जेठवाणी, दिपक मुळे, राघवेंद्र कट्टी, कविता जोशी-शिरपूरकर यांच्या योगदानातून साकारली.

000000
















 पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी वितरीत करा 

·         पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश 

·         मार्च ते सप्टेंबर 2021 कालावधीत एकुण 455 कोटी 72 लाख निधी सर्व तालुक्यांना  

नांदेड, दि. 3 (जिमाका) :- अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: जिल्ह्यातील विविध गावात नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन धिर दिला होता. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज त्यांनी आढावा बैठक घेतली. यात मार्च ते सप्टेंबर 2021 या कालवधीत एकुण 455 कोटी 72 लाख इतका निधी सर्व तालुक्यांना वितरीत करुन वितरणाची कार्यवाही आजपासून सुरू केली.  

यात मार्च, एप्रिल व मे 2021 या कालावधीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 लाख 65 हजार 760 रुपयांचा, माहे जुलै 2021 साठी 71 हजार 221 बाधित शेतकऱ्यांच्या एकुण 44 हजार 609.60 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकुण 30 कोटी 35 लाख 46 हजार 280 रुपये तर माहे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत 7 लाख 90 हजार 535 बधित शेतकऱ्यांच्या एकुण 5 लाख 61 हजार 719.29 हेक्टर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 291 कोटी 79 लाख 90 हजार 370 व वाढीव प्रमाणे 133 कोटी 56 लाख 81 हजार 242 असे एकुण 425 कोटी 36 लाख 71 हजार 613 रुपये निधी वितरीत केला आहे.  

माहे मार्च ते मे 2021 या कालावधीत तालुकानिहाय वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात एका शेतकऱ्याच्या 0.30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 5 हजार 400 रुपये, कंधार तालुक्यात 47 शेतकऱ्याच्या 37.66 हेक्टर आर क्षेत्रासाठी 6 लाख 77 हजार 880, लोहा तालुक्यात 37 शेतकऱ्याच्या 44.4 हेक्टर आर क्षेत्रासाठी 7 लाख 39 हजार 800, बिलोली तालुक्यात 2 शेतकऱ्याच्या 1 हेक्टर आर क्षेत्रासाठी 6 हजार 800, मुखेड तालुक्यात 6 शेतकऱ्याच्या 6 हेक्टर आर क्षेत्रासाठी 10 लाख 8 हजार, धर्माबाद तालुक्यात 40 शेतकऱ्याच्या 30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 40 लाख 5 हजार, हदगाव तालुक्यात 28 शेतकऱ्याच्या 15.88 हेक्टर आर क्षेत्रासाठी 1 लाख 17 हजार 480, हिमायतनगर 1 शेतकऱ्याच्या 0.30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 5 हजार 400 असे एकुण 20 लाख 65 हजार 760 रुपये मदत निधी वितरीत करण्यात आली. 

जुलै 2021 या महिन्यात तालुक्यानिहाय वितरीत केलेला निधी पुढीलप्रमाणे आहे. नांदेड तालुक्यात 5 हजार 174 शेतकऱ्यांच्या 1 हजार 322 हेक्टर आर क्षेत्रासाठी 89 लाख 89 हजार 600 रुपये, कंधार तालुक्यात 773 शेतकऱ्याच्या 159 हेक्टर आर क्षेत्रासाठी 10 लाख 81 हजार 200 रुपये, लोहा तालुक्यात 5 हजार 200 शेतकऱ्याच्या 1 हजार 30 हेक्टर आर क्षेत्रासाठी 70 लाख 4 हजार, बिलोली तालुक्यात 13 हजार 603 शेतकऱ्याच्या 7 हजार 534 हेक्टर आर क्षेत्रासाठी 5 कोटी 12 लाख 31 हजार 200, नायगाव तालुक्यात 895 शेतकऱ्याच्या 388 हेक्टर आर क्षेत्रासाठी 26 लाख 38 हजार 400, देगलूर तालुक्यात 11 हजार 835 शेतकऱ्याच्या 9 हजार 945 हेक्टर आर क्षेत्रासाठी 6 कोटी 76 लाख 26 हजार, भोकर तालुक्यात 1 हजार 585 शेतकऱ्याच्या 1 हजार 175.20 हेक्टर आर क्षेत्रासाठी 81 लाख 2 हजार 580, धर्माबाद तालुक्यात 494 शेतकऱ्याच्या 307 हेक्टर आर क्षेत्रासाठी 20 लाख 87 हजार 600, उमरी तालुक्यात 221 शेतकऱ्याच्या 153 हेक्टर आर क्षेत्रासाठी 10 लाख 40 हजार 400 रुपये, हिमायतनगर तालुक्यात 188 शेतकऱ्याच्या 167.40 हेक्टर आर क्षेत्रासाठी 9 लाख 37 हजार रुपये, किनवट तालुक्यात 31 हजार 253 शेतकऱ्याच्या 22 हजार 459 हेक्टर आर क्षेत्रासाठी 15 कोटी 28 लाख 8 हजार 300 रुपये असे एकुण 30 कोटी 35 लाख 46 हजार 280 रुपये मदत निधी तालुक्यांना वितरीत केला आहे.  

ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालवधीत नांदेड तालुक्यात 36 हजार 920 शेतकऱ्यांच्या 21 हजार 838.20 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 26 लाख 28 हजार 430 वाढीव प्रमाणे 5 कोटी 25 लाख 2 हजार 70 असे एकुण 16 कोटी 51 लाख 30 हजार 500 रुपये. 

अर्धापूर तालुक्यात 32 हजार 412 शेतकऱ्यांच्या 22 हजार 636 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 58 लाख 98 हजार 550 वाढीव प्रमाणे 5 कोटी 44 लाख 15 हजार 200 असे एकुण 17 कोटी 3 लाख 13 हजार 750 रुपये.  

कंधार तालुक्यात 74 हजार 28 शेतकऱ्यांच्या 50 हजार 623 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 25 कोटी 82 लाख 84 हजार 700 वाढीव प्रमाणे 12 कोटी 15 लाख 7 हजार 800 असे एकुण 37 कोटी  97 लाख 92 हजार 500 रुपये. 

लोहा तालुक्यात 1 लाख 12 हजार 762 शेतकऱ्यांच्या 57 हजार 232 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 29 कोटी 53 लाख 50 हजार 450 वाढीव प्रमाणे 13 कोटी 64 लाख 77 हजार 50 असे एकुण 43 कोटी 18 लाख 27 हजार 500 रुपये. 

बिलोली तालुक्यात 45 हजार 527 शेतकऱ्यांच्या 34 लाख 491.10 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 17 कोटी 64 लाख 14 हजार 250 वाढीव प्रमाणे 8 कोटी 27 लाख 37 हजार असे एकुण 25 कोटी 91 लाख 51 हजार 250 रुपये.  

नायगाव तालुक्यात 53 हजार 948 शेतकऱ्यांच्या 42 हजार 503 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 21 कोटी 93 लाख 38 हजार 100 वाढीव प्रमाणे 10 कोटी 13 लाख 54 हजार 400 असे एकुण 32 कोटी 6 लाख 92 हजार 500 रुपये. 

देगलूर तालुक्यात 50 हजार 302 शेतकऱ्यांच्या 35 हजार 849 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 18 कोटी 39 लाख 85 हजार 650 वाढीव प्रमाणे 8 कोटी 57 लाख 44 हजार 350 असे एकुण 26 कोटी 97 लाख 30 हजार रुपये. 

मुखेड तालुक्यात 80 हजार 277 शेतकऱ्यांच्या 58 हजार 464 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 29 कोटी 87 लाख 87 हजार 100 वाढीव प्रमाणे 14 कोटी 3 लाख 45 हजार 400 असे एकुण 43 कोटी 91 लाख 32 हजार 500 रुपये. 

भोकर तालुक्यात 40 हजार 732 शेतकऱ्यांच्या 37 हजार 310.50 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 19 कोटी 3 हजार 800 वाढीव प्रमाणे 8 कोटी 95 लाख 32 हजार 450 असे एकुण 27 कोटी 98 लाख 66 हजार 250 रुपये. 

मुदखेड तालुक्यात 30 हजार 33 शेतकऱ्यांच्या 22 हजार 355 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 96 लाख 42 हजार 400 वाढीव प्रमाणे 5 कोटी 23 लाख 32 हजार 600 असे एकुण 17 कोटी 19 लाख 75 हजार रुपये.  

धर्माबाद तालुक्यात 37 हजार 286 शेतकऱ्यांच्या 25 हजार 90 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 12 कोटी 81 लाख 56 हजार 700 वाढीव प्रमाणे 6 कोटी 1 लाख 75 हजार 800 असे एकुण 18 कोटी 83 लाख 32 हजार 500 रुपये. 

उमरी तालुक्यात 33 हजार 652 शेतकऱ्यांच्या 33 हजार 766 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 20 कोटी 52 लाख 5 हजार 775 वाढीव प्रमाणे 7 कोटी 26 लाख 65 हजार 475 असे एकुण 27 कोटी 78 लाख 71 हजार 250 रुपये. 

हदगाव तालुक्यात 82 हजार 532 शेतकऱ्यांच्या 50 हजार 2 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 25 कोटी 50 लाख 10 हजार 200 वाढीव प्रमाणे 12 कोटी 4 हजार 800 असे एकुण 37 कोटी 50 लाख 15 हजार रुपये. 

हिमायतनगर तालुक्यात 32 हजार 333 शेतकऱ्यांच्या 21 हजार 834.60 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 11 कोटी 14 लाख 59 हजार 975 वाढीव प्रमाणे 5 कोटी 23 लाख 76 हजार 675 असे एकुण 16 कोटी 38 लाख 36 हजार 750 रुपये. 

किनवट तालुक्यात 22 हजार 717 शेतकऱ्यांच्या 34 हजार 94 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 17 कोटी 79 लाख 29 हजार 600 वाढीव प्रमाणे 8 कोटी 7 लाख 95 हजार 400 असे एकुण 25 कोटी 87 लाख 35 हजार रुपये. 

माहूर तालुक्यात 25 हजार 74 शेतकऱ्यांच्या 13 हजार 630.89 हेक्टर आर क्षेत्रासाठी एसडीआरएफ प्रमाणे 6 कोटी 95 लाख 54 हजार 609 वाढीव प्रमाणे 3 कोटी 27 लाख 14 हजार 762 असे एकुण 10 कोटी 22 लाख 69 हजार 363 रुपये निधी वाटप आहे.  

अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पूर‍ परिस्थितीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात वितरीत करण्यात आलेला निधी बाधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे दिले आहेत. 

000000



Wednesday, November 3, 2021

 मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

देगलूर विधानसभा मतदार संघाचे पोटनिवडणूक 2021 मुळे देगलूर या विधानसभा मतदार संघासाठी 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम आयोगाकडून प्राप्त झाला असून या कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पुनरिक्षण कार्यक्रमाचे उपक्रम व कालावधी पुढीलप्रमाणे आहे. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीसाठी सोमवार 8 नोव्हेबर 2021 हा कालावधी आहे. दावे व हरकती  स्विकारण्याचा कालावधी सोमवार 8 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार 7 डिसेंबर 2021 आहे.  विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार 13 नोव्हेंबर ते रविवार 14 नोव्हेंबर 2021 व शनिवार 27 नोव्हेंबर ते रविवार 28 नोव्हेंबर 2021 असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे सोमवार 27 डिसेंबर 2021 पर्यत आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यासाठी बुधवार 5 जानेवारी 2022 असा कालावधी आहे.

 

या कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 13 व 14 नोव्हेंबर 2021 रोजी तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी मतदाराचे नाव नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी  कळविले आहे.  

0000

Tuesday, November 2, 2021

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत

जितेश अंतापूरकर विजयी 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या 30 फेऱ्यानंतर निवडणूकीचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केला. इंडियन नॅशनल कॉग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे 41 हजार 933 मताच्या फरकाने विजयी झाले. 

उमेदवार निहाय मतमोजणीत मिळालेले मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (इंडियन नॅशनल कॉग्रेस 1 लाख 8 हजार 840), सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी  66 हजार 907) , उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी 11 हजार 348), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) 467),  प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी 155), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) 215), अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष 143), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष 183), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष 274), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष 243), श्रीमती विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष 496), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष 486), नोटा (वरीलपैकी कोणीही) नाही (1 हजार 103) , रद्द झालेले मतदान 30 आहे, असे एकुण 1 लाख 90 हजार 890 एवढे मतदान झाले आहे. या देगलूर पोटनिवडणूकीसाठी एकुण 150 अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते.

00000




 जिल्हास्तरीय समितीसाठी इच्छूक पात्र महिलांनी

11 नोव्हेंबरपर्यत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) 2 :-  जिल्हास्तरावरील विविध समित्या एकत्रित करुन सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती गठित करण्यात येणार आहे. इच्छूक व पात्र महिला संघटना, संस्था व कायद्याच्या संदर्भात कार्यरत अशासकीय महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कार्याचा अनुभवासह परीपूर्ण प्रस्ताव गुरुवार 11 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शास्त्रीनगर, भाग्यनगर नांदेड येथे सादर करावेत. 

जिल्हा महिला बाल विकास विभागांतर्गंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील विविध समित्या एकत्रित करुन सर्व समावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती गठित करण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. या समितीमध्ये स्थानिक महिला संघटनाचे, संस्थाचे दोन प्रतिनिधी तसेच महिलांच्या कायद्या संदर्भात कार्यरत 5 अशासकीय महिला कार्यकर्त्याची अशासकीय सदस्य म्हणून निवड करावयाची आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकावर  (02462-261242) संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  डॉ. अब्दुल रशिद शेख यांनी केले आहे.   

00000

 महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे  

नांदेड दि. 2  (जिमाका) :- महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती- 2019 योजनेंर्तगत 197 खातेदारांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्ती योजनेची रक्कम जमा करता येणार नाही. यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेबर 2021 या कालावधी पासून जिल्हास्तरावर आधार प्रमाणिकरणासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती सहकारी संस्थेच्या उपनिबंधक डॉ. शुभांगी  गोंड यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. 

नांदेड तालुक्यात या योजनेंतर्गत 6 हजार 519 पात्र कर्जखात्यांच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 6 हजार 322 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून 197 खातेदारांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहेत. या योजनेतील 197 पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबंधित लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार प्रमाणिकरण व तक्रार निराकरण टप्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेव्दारे पूर्ण करण्याच्या सूचना प्रधान सचिव (सहकार) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. 

विशेष मोहिमेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक असून आधार प्रमाणिकरणासाठी ही अंतिम संधी आहे. नांदेड तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करून  घ्यावे, असेही आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

Monday, November 1, 2021

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह,

ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार येत्या 3, 4 व 5 नोव्हेंबर हे तीन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 3, 4 व 5 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये यात या गोष्टी करा- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. 

पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये

पूर येण्यापूर्वी: अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरूक रहावे. 

पूर दरम्यान : पूर प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले/क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा. 

पूर येऊन गेल्यानंतर मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका.  कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका. 

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास: घरातील वस्तू  पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा.  कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 


केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...