Thursday, February 29, 2024

 वृत्त क्रमांक 186

नायगाव येथे 5 मार्चला

रेती साठ्याचा लिलाव

 

नांदेड दि. 29 : अवैध उत्खननातून प्राप्त करण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा लिलाव तहसील कार्यालय नायगाव (खै) येथे 5 मार्चला सकाळी 11.30 वाजता ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नायगाव यांनी केले आहे.

 

महसूल विभागाने सन 2019-20 मधील सांगवी व मेळगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात रेती हस्तगत केली आहे. बिलोली उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या लिलावासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नायगाव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...