Thursday, February 29, 2024

 वृत्त क्रमांक 185 

सोमवारी लोकशाही दिन

 

नांदेड दि. 29 : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवन येथे सोमवार दिनांक 4 मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्यामार्फत आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 पूर्वी आपल्या तक्रारी, निवेदने, जमा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. यावेळेस 4 मार्च रोजी सकाळी बारा वाजता पर्यंत तक्रार करणाऱ्यांनी आपले निवेदन सादर करायचे आहे. त्यानंतर लगेचच तक्रार निवारणाचे काम सुरू होईल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...