Thursday, September 15, 2016

सैनिक कल्याण विभागामध्ये
विविध पदांसाठी सरळसेवेने भरती
नांदेड, दि. 16 :- सैनिक कल्याण विभागाच्या कार्यालयात गट-क पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने गुरुवार 13 ऑक्टोंबर पर्यंत सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainik.com या संकेतस्थळावर जिल्हयातील माजी सैनिकांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
यामध्ये लिपीक टंकलेखक-8, कल्याण संघटक-4 व वसतीगृह अधिक्षक-1  पदांसाठी अर्ज करण्याकरिता सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर पहिल्या पानाच्या (Home Page) उजव्याबाजुस सेवाभरती यावर क्लीक केल्यानंतर ऑनलाईन अर्ज उपलब्ध्‍ा होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांचेशी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...