Thursday, September 15, 2016

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शनिवारी
विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ
नांदेड, दि. 15 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शनिवार 17 सप्टेंबर 2016 रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. तसेच सकाळी 8.30 वाजता हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानंवदना व पुष्पचक्र अर्पणाचा कार्यक्रम होणार आहे.  या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे. 
या समारंभासाठी निमंत्रीतांनी राष्ट्रीय, समारंभीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्यादृष्टिने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान , या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.15 पूर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...