वृत्त क्रमांक
महा-उपलब्धी अॅपची निवृत्तीवेतनधारकांना माहिती
देण्यासाठी मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन
नांदेड (जिमाका), दि. 30 : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब
निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन विषयक सेवा जलद, सुलभ व
पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘Maha-UPLABHDHI’
(महा-उपलब्धी) मोबाईल अॅपबाबत माहिती देण्यासाठी मंगळवार, दि. 6 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी
11 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी
कार्यालय परिसर, नांदेड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
आहे.
वित्त विभागाच्या दि. 19 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात
आलेल्या मोबाईल अॅपच्या विविध सुविधांची माहिती निवृत्तीवेतनधारक व कुटुंब
निवृत्तीवेतनधारकांना व्हावी, यासाठी अॅपच्या वापराबाबत
कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रधान सचिव (लेखा
व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय,
मुंबई हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
नांदेड कोषागारामार्फत निवृत्तीवेतन व
कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व संबंधितांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून Maha-UPLABHDHI
मोबाईल अॅपच्या सुविधांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी शोभा मुंढे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment