Sunday, June 28, 2026

वृत्त  

आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नांदेड जिल्ह्यातील बहादूरपुरा येथील पेटकर कुटुंबाच्या प्रेरणादायी उपक्रमाचा विशेष उल्लेख केला.

आपल्या घरातील विवाहसोहळ्याचे औचित्य साधत पेटकर कुटुंबाने गावातील सुमारे ३,५०० नागरिकांसाठी ₹१ लाखांपर्यंतचा अपघात विमा उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. वैयक्तिक आनंदाचे रूपांतर समाजहिताच्या उपक्रमात कसे करता येते, याचे हे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे.

सेवा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी या मूल्यांना बळ देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

000000

https://x.com/narendramodi/status/2071139627268964405?s=48

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...