Tuesday, June 16, 2026

वृत्त क्रमांक

संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा उत्पादनासाठी संयुक्त आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. 15 जून : संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होणारी चारा टंचाई लक्षात घेऊन चारा उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त आढावा बैठक काल १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस नांदेड पाटबंधारे मंडळ, दक्षिण नांदेड पाटबंधारे मंडळ, अप्पर पैनगंगा प्रकल्प, इसापूर, लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत संभाव्य दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

तसेच, उपलब्ध जलस्रोतांचा नियोजनबद्ध वापर करून चारा पिकांचे उत्पादन वाढविणे, आवश्यक नियोजन करणे आणि संबंधित विभागांनी परस्पर सहकार्याने तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

आगामी काळात जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करून प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

000000



No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...