Tuesday, October 14, 2025

 वृत्त क्रमांक  1095

सैनिक कल्याण विभागात 72 पदांसाठी भरती

माजी सैनिक उमेदवारांनी 5 नोव्हेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 14 ऑक्टोबर :- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण 72 पदासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 5 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

वरील पदापैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगात्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचेमार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

00000 

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...