वृत्त क्रमांक 435
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत
नांदेड दि. 26 एप्रिल :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार राजू नवघरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यावेळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदींची उपस्थिती होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी जिल्ह्यातील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले.
00000
.jpeg)



No comments:
Post a Comment