Wednesday, January 24, 2024

वृत्त क्र. 68

 इस्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात दहा हजार पदासाठी भरती

नांदेड (जिमाका) दि. 24:- इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी मेघाभरती घेतली जाणार आहे. या पदांसाठीचा पगार प्रति महिना 1.5 ते 2 लाखापर्यंत असून या पदासाठी उमेदवारांना 27 जानेवारी 2024 पर्यत अर्ज करता येतील. फ्रेमवर्क / शटरिंग कारपेंटर, बार बेंडिगं मेसन (गंवडी), सेरेमिक टायलिंग मेसन (गवंडी), प्लास्टरिंग मेसन (गवंडी) अशा पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. अर्जदाराने https://rojgar.mahaswayam.gov.in

या संकेतस्थळावर अर्ज करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त यांनी  केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...