Friday, December 1, 2023

 5 डिसेंबरला “जागतिक मृदा दिवस” होणार साजरा    

नांदेड (जिमाका), दि. १ : सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याचबरोबर पाण्याचा अर्निबंधीत  वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी “जागतिक मृदा दिवस” साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...