Saturday, November 4, 2023

 वृत्त

नांदेड येथील सत्यवान अंभोरे यांना

कुणबी जातीचे पहिले प्रमाणपत्र वाटप

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड येथील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र आज सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना देण्यात आले. माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील पहिले कुणबी जातीचे ओबीसी प्रर्वगाचे प्रमाणपत्र देण्यात आले. सत्यवान दिगंबरराव अंभोरे यांना उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. यावेळी अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी काम करणारे स्वराज्य संघटना राज्य उपाध्यक्ष तथा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, पदाधिकारी संकेत पाटील, श्याम कोकाटे, सदानंद पुयड, सुभाष कोल्हे, यांची उपस्थिती होती.

000000




No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...