Wednesday, September 20, 2023

कोतवाल पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महसूल विभागातील कोतवाल पदभरती परीक्षा-2023  रविवार 24 सप्टेंबर 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील 16  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.


जिल्ह्यातील विविध 16 केंद्रावर दुपारी 2 ते दुपारी 3 या कालावधीत परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...