Monday, August 28, 2023

अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती यादीबाबत आक्षेप असल्यास 11 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन

 अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती यादीबाबत

आक्षेप असल्यास 11 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. पात्र नगरपरिषद/नगरपंचायत/नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते.

त्या अनुषंगाने पात्र अपात्र उमेदवारांची यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांचे नोटीस बोर्डावर 28 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी प्रसिध्द यादीबाबत काही आक्षेप असल्यास 11 सप्टेंबर 2023 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड कार्यालयात लेखी पुराव्यासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी व्हि.एस. बोराटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...