Friday, July 14, 2023

 अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर  नियतन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2023 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन सुलभ पॅकींगमध्ये मंजूर केले आहे. 

 

या तीन महिन्यासाठी शासनाकडून 2 हजार 152 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. यात नांदेड तालुक्यासाठी 180, अर्धापूर 33, मुदखेड 36, कंधार 51.50, लोहा 147.50, भोकर 67.50, उमरी 46, देगलूर 108.50, बिलोली 115, नायगाव 115.50, धर्माबाद 64, मुखेड 202.50, किनवट 468.50, माहुर 212, हदगाव 206.50, हिमायतनगर 98  असे एकूण 2 हजार 152  नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...