Wednesday, June 21, 2023

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रविवार दिनांक 25 जून रोजी अबचल नगर मैदान, नांदेड येथे  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी  वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 किंवा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...