Monday, December 12, 2022

 मोटार कार पसंती क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु 


नांदेड (जिमाका) दि. 12  :-  मोटार कार साठी एमएच-26-सीइ ही नविन मालिका शुक्रवार 16 डिसेंबर 2022 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेल सह) अर्ज गुरुवार 15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास शुक्रवार 16 डिसेंबर 2022  रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...