Saturday, December 10, 2022

9.12.2022

 जिल्हा जात पडताळणी कार्यालयात

संत जगनाडे महाराज जयंती साजरी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- संत जगनाडे महाराज यांचा जन्म इ. स. 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाली. ते संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्या पैकी होते. अशा महापुरुषांची जयंती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एस. जे. रणभीरकर, व्ही. बी. आडे, संजय पाटील, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होनवडजकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, मोशीन शेख, संजय मंत्रे लहानकर यांची उपस्थिती होती.

संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार होते. मुलांला हिशोब करता येणे आवश्यक असल्यामूळे संताजी महाराजांना लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण त्यांना मिळाले होते. घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले होते. त्यामूळे त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...