Friday, December 23, 2022

 आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या

ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यत मुदतवाढ 


नांदेड (जिमाका) दि. 23 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली  (कासराळी) येथील केंद्रावर सुरू आहे. ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शनिवार 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 


नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...