Thursday, July 29, 2021

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात

तंबाखू सेवन करणाऱ्या 15 व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड (जिमाका) दि. 29 :- येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्या 15 व्यक्तींवर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकामार्फत कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही नुकतीच करण्यात आली. या कार्यवाहीत 2 हजार 850 रुपयाचा दंड आकारण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  ही कार्यवाही करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच अन्न व औषध विभागाकडून सहाय्यक आयुक्त प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न संरक्षण अधिकारी उमेश कावळे आदी उपस्थित होते. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी केले आहे.

*****


No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...