Thursday, December 5, 2019


कापुस, तूर, मका पिकांसाठी कृषि संदेश
नांदेड दि. 5 :- जिल्हयात  कापुस, तुर, मका, पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. पिकावरील किडीपासुन संरक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापुस पिकावर गुलाबी बोंडअळीसाठी सायपरमेथ्रीन 10 ईसी @ 7.5 मिली किंवा फेनप्रोपॅथ्रीन 10 ईसी @  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे व फरदड टाळावी.
तुर पिकावर क्विनलफॉस 25 ईसी @ 30 मिली किंवा क्लोरॅनट्रॉनीप्रोल 18.5 एस सी @ 3 मिली  10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
मका पिकावर लष्करी अळया गोळा करुन नष्ट कराव्यात व मेटारहाय जियम निसोप्ली 50 ग्रॅम नोमुरिया रिलाई 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...