Friday, November 22, 2019


मोटार सायकलसाठी नवीन मालिका
नांदेड दि. 22 :- मोटार सायकलसाठी एमएच 26 बीएस ही नविन मालिका 25 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज सोमवार 25 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत व त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.  
ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मंगळवार 26 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेस्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...