Monday, November 19, 2018


योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी
बुधवारी वाहनांची तपासणी
नांदेड, दि. 19 :- ईद-ए-मिलाद निमित्त 21 नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. 
तसेच या दिवशी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी अपॉईमेन्ट घेतलेल्या उमेदवारांची चाचणीसुध्दा घेतली जाणार नाही. संबंधितांनी 21 नोव्हेंबरला अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी व शिकाऊ / पक्के अनुज्ञप्तीची चाचणी 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. याबाबत वाहन मालक, चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0 0 0

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...