Tuesday, July 3, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
गुरुवारी अग्रवाल यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय अ‍धिकारी यांच्यावतीने “उज्ज्वल नांदेड" मोहिमेअतंर्गत गुरुवार 5 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते सायं 5.30 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे "इंग्रजी" या विषयावर पुणे येथील विषयतज्ज्ञ रत्नेश अग्रवाल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...