Thursday, July 19, 2018


दहावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ठ
विद्यार्थ्यांची नाव नोंदणी 30 जुलै पासून
नांदेड, दि. 19 :- इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2019 या परीक्षेसाठी खाजगीरित्या (फॉर्म नं. 17) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज http://form17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सोमवार 30 जुलै 2018 पासून सुरु करण्यात येत आहे, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.
खाजगी विद्यार्थ्यांने दहावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन सोमवार 30 जुलै 2018 ते शनिवार 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत भरावीत. मंगळवार 31 जुलै 2018 ते शनिवार 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावीत. शुक्रवार 31 ऑगस्ट 2018 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...