Thursday, June 21, 2018


मधमाशा पालन उद्योग वाढीसाठी प्रशिक्षण
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात मधमाशा पालन उद्योगात वाढ होऊन शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे महत्व अवगत व्हावे व परागीभवनासाठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत आत्मा योजनेअंतर्गत मधमाशा पालन उद्योगाकरीता प्रात्यक्षिकासाठी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून शेतकऱ्यांना सातेरी / मेलीफेरा मधमाशाची प्रात्यक्षिकासाठी मधपेटी उपलब्ध करुन मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेणेसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ  उद्योग भवन तळ मजला कार्यालय नांदेड येथे  संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.                                                 
00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...